नातेपुते ऐतिहासिक नगरपंचायतीसाठी ७६.२ टक्के मतदान
– 13जागांसाठी ५४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद,

मतमोजणीच्या तारखेकडे उमेदवारांचे व मतदारांचे लक्ष
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे : नातेपुते ऐतिहासिक नगरपंचायतीसाठी मंगळवारी दि.२१ रोजी सकाळी ७ :३० वाजल्यापासून शांततेत मतदानास सुरुवात झाली सकाळी काही मतदान केंद्रावरती मतदारांची मतदानासाठी गर्दी तुरळक दिसत होती मात्र दुपारनंतर सर्व मतदान केंद्रावरती मतदारांची गर्दी दिसून आले एकूण १७ प्रभाग आहेत यापैकी १३ प्रभागासाठी निवडणूक झाली आता ४ प्रभागासाठी १८ जानेवारीला निवडणूक होणार आहे १३ जागेसाठी ५४ उमेदवाराचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले एकूण मतदान ७६ टक्के झाले एकूण मतदान १०९५४ पैकी ८३४७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे प्रभाग क्र १ मध्ये मतदान ५९७ पैकी ५०४, प्रभाग क्र २ मध्ये मतदान ६८८ पैकी ४७८ , प्रभाग क्र ३ मध्ये मतदान ६५३पैकी ४७८. प्रभाग क्र ४ मध्ये मतदान ५३० पैकी ४१०. प्रभाग क्र ५ मध्ये मतदान १४०४ पैकी १०८७.प्रभाग क्र ६ मध्ये ८६१ पैकी ७११ प्रभाग क्र ११ मध्ये मतदान ४१८ पैकी ३६७. प्रभाग क्र १२ मध्ये मतदान ८१८ पैकी ६०६. प्रभाग क्र १३ मध्ये मतदान ८६३ पैकी ६३८. प्रभाग क्र १४ मध्ये मतदान ८२६ पैकी ६०७. प्रभाग क्र १५ मध्ये मतदान ८८१ पैकी ६९२. प्रभाग क्र १६ मध्ये मतदान ११४८ पैकी ८९१. प्रभाग क्र १७ मध्ये मतदान १२६७ पैकी ८७८, मतदान झाले. पहिली व ऐतिहासिक निवडणूक असल्याने या निवडणुकीमध्ये तुरस पाहावयास मिळाली.ही निवडणुक पंच रंगी झाल्याचे निदर्शनास आले.यामध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांचा गटाची जनशक्ती आघाडी तर ऍड बी वाय राऊत यांची नागरी विकास आघाडी व राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर तसेच बाबाराजे देशमुख यांचे बंधू राष्ट्रवादीचे नेते धैर्यशील भाऊ देशमुख यांचा समाजभूषण पॅनल तसेच वंचित बहुजन आघाडी, मनसे व अपक्ष उमेदवारा मध्ये तुरस पाहावयास मिळाली.या निवडणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे प्रभाग क्रमांक ३ मधील १० उमेदवार मतदानाच्या दिवशी एकत्र आले व चक्क फोटव सेल्फी काढला. व तो फोटो अपक्ष उमेदवार समीर सोरटे यांनी फोटो सोशल मीडिया वरती टाकला या फोटो मुळे सोशल मीडिया वरती चर्चेला उधाण आले. निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माधव खांडेकर यांनी काम पाहिले. तसेच निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



