दिव्यांगांचा पाच टक्के निधी तात्काळ द्या अन्यथा आंदोलन

एन.डी.एम.जे संघटनेचे दिव्यांग आघाडीचे शंभर टक्के अंध जीवन (तात्या) धांडोरे यांचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन

दिव्यांगांचा पाच टक्के निधी तात्काळ द्या अन्यथा आंदोलन आंध जीवन धांडोरे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना दिव्यांगांकडे मात्र दुर्लक्ष होत असून दिव्यांगांचा हक्काचा 5 टक्के निधी प्रत्येक ग्रामपंचायतींच्या मार्फत प्रत्येक गावातील दिव्यांग बांधवांना दिला जातो हा निधी माळशिरस तालुक्यात कोणत्याही गावात निधी दिव्यांगांना दिला नाही तो तात्काळ देण्यात यावा व ज्या ग्रामपंचायतींनी 5 टक्के निधी अद्याप दिला नाही त्या ग्रामसेवकांना निलंबित करावे म्हणून यामुळे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) च्या दिव्यांग युवा आघाडीचे प्रमुख शंभर टक्के अंध असलेले जीवन (तात्या) धांडोरे यांनी थेट माळशिरस चे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले अन्यथा 26 जानेवारी 2022 रोजी तहसीलदार कार्यालयापुढे आंदोलन करणार असल्याचे सांगितले. याची गंभीर दखल घेत तहसीलदार निंबाळकर यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे जलद अहवाल मागितला आहे.
100 टक्के अंध असलेला जीवन (तात्या) धांडोरे याच्या सामाजिक कामाचे सर्वत्र कौतुक होत असून युवकांनी यातून शिकण्यासारखे आहे
.

You may have missed