नातेपुते येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – नातेपुते तालुका माळशिरस येथे पत्रकार दिनानिमित्त विविध ठिकाणी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
पत्रकार हा समाजाचा आरसा असल्याने पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायत नातेपुते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,राष्ट्रीय समाज पक्ष, महात्मा फुले समता विकास परिषद,नागरी विकास आघाडी,वारकरी संप्रदाय तसेच वैभव कवितके मित्रपरिवार नातेपुते,पुरोगामी महाराष्ट्र व एन.डी.एम.जे,अक्षय भांड मित्रपरिवार, गणेश प्रतिष्ठान नातेपुते,लोकमंगल बँक,अण्णा पांढरे यांच्या वतीने डायरी,पेन, गुलाब पुष्प देऊन पत्रकारांचा उचित सन्मान करण्यात आला.यावेळी नगर पंचायत चे मुख्याधिकारी माधव खांडेकर,माजी सरपंच ऍड.बी वाय.राऊत राष्ट्रवादीचे नेते धैर्यशीलभाऊ देशमुख, राजकुमार हिवरकर,निजाम काझी,अक्षय भांड विनायक ऊराडे, डॉक्टर नरेंद्र कवितके वैभव कवितके, नंदकिशोर ढालपे,शाहिद भाई मुलाणी, पै.सुळ, माऊली सरक, बिपिन सातपुते, शेखर आटक, नी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी दुग्ध विकास मंत्र महादेवजी जानकर यांनी फोनद्वारे नातेपुते येथील सर्व पत्रकारांना वैयक्तिक फोन करून शुभेच्छा दिल्या.पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायत येथे माझी वसुंधरा ही प्रतिज्ञा घेण्यात आली.तसेच पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा निकाल मुख्य अधिकारी माधव खांडेकर व पत्रकारांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार सुनील दादा राऊत यांनी आभार व्यक्त केले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार लतीफ भाई नदाफ, सुनील दादा राऊत, श्रीकांत बाविस्कर,एन के साळवे, अभिमन्यू आठवले,आनंद लोंढे,प्रमोद शिंदे,विलास भोसले,मनोज राऊत,आनंद जाधव,उमेश पोतदार, सचिन रणदिवे,श्रीराम भगत,अमित सोरटे. व इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.








