12 जानेवारी जिजाऊ जयंतीनिमित्त पिरळे येथे पुरोगामी महाराष्ट्र व ग्रामपंचायत यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे दिनांक 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती तसेच सावित्री-जिजाऊ जयंती सप्ताह निमित्त पुरोगामी महाराष्ट्र व ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने तसेच नेत्र रुग्णालय महम्मद वाडी हडपसर पुणे यांच्या विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या शिबिरात डोळे तपासणी करून अल्पदरात चष्मे वाटप करण्यात येणार आहे.
हे शिबिर ग्रामपंचायत कार्यालय पिरळे येथे
सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत सुरू राहणार असून या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरजू ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन पिरळे गावचे सरपंच संदीपसेठ नरोळे, पुरोगामी महाराष्ट्रचे प्रमोद शिंदे, व उपसरपंच उमेश खिल्लारे ,मोहम्मद वाडी हॉस्पिटलचे डॉ.वाघमारे तसेच ग्रा.पं.सदस्यांनी आव्हान केले आहे.

You may have missed