नातेपुतेत संक्रातनिमित्त व्यापाऱ्याकडून भाजी पेंडी 100 ला विकून शेतकऱ्याची फसवणूक तर ग्राहकांची लूट
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)-

नातेपुते ता.माळशिरस येथे मकर संक्रांतीच्या भोगी सणानिमित्त व्यापाऱ्याकडून भाजी पेंडी शंभर रुपयाला विकून शेतकऱ्याची फसवणूक तर ग्राहकांची लूट झाल्याचं निदर्शनात आला आहे. परंपरेनुसार मकर संक्रांतीच्या अगोदर आदल्या दिवशी भोगी असते आणि या भोगी सणानिमित्त सर्व प्रकारच्या भाजीपाला एकत्र करून त्याची गर्गोटी(खेंगाट)भाजी व तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवण्याची परंपरा आहे या भाज्यांमध्ये विटामिन ए बी सी मोठ्या प्रमाणात असते.यामध्ये प्रामुख्याने चाकवताची भाजी, चुका,पालक,गाजर,बोरे,पावटा ,घेवडा,शेंगा,तीळ हरभरा,जवळपास बारा भाज्यांना एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते.आणि ती भाजी करावीच लागते असं सांगितलं जातं.त्यामुळे बाजारातून सामान्य ग्राहक वाट्टेल ती किंमत मोजून भाजीपाला आणत असतो.परंतु बुधवार बाजारात या भाजीपाल्याचा कहर झाला आहे.व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून चार ते पाच रुपयाला भाजीची पेंडी घेऊन त्याचे शॉर्टेज करून शेवटी भाजी 100 रुपया पर्यंत विकून शेतकऱ्यांची फसवणूक व सामान्य नागरिकांची लूट केली आहे
पावटा सुद्धा एरवी 40 रुपये किलो विकला जातो बुधवारी बाजारात 200 रुपये किलो पावटा विकला गेला. तर ओला वाटाणा 120 रुपये किलो विकला गेला. आंबट बोरे सुद्धा 200 रुपये किलो पर्यंत विकली गेली. व्यापाऱ्यांना विचारले असता एवढे महाग भाजीपाला का ? व्यापाऱ्याकडून उत्तर देण्यात आले.”आजचा दिवस असतो,महागाई वाढली आहे” परंतु महागाईच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून कष्टकरी शेतकऱ्यांची त्यांची फसवणूक केली जाते व त्यासोबत ग्राहकांची लूट केली जाते यावरून दिसून येत आहे. अशा धूर्त व्यापाऱ्यांवर वेळीच आवर घातली पाहिजे.