माळशिरस तालुका ग्राहक पंचायत यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

माळशिरस तालुका ग्राहक पंचायत यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-माळशिरस तालुका ग्राहक पंचायत संघटना यांनी राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद,यांची जयंती साजरी केली तसेच त्यांच्या विचारांचे चिंतन केले त्याचप्रमाणे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या कार्याचे स्मरण करुन आदरांजली वाहीली.प्रमुख पाहुणे श्रीकांत बाविस्कर जिल्हा उपाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम तालुकाआध्यक्ष श्री दत्तात्रय थोरात यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला , यावेळी समाज भूषण पॅनलचे मार्गदर्शक धैर्यशील भाऊ देशमुख अशोक राऊत उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत दस्तगीरभाई मुलाणी तालुका संघटक यांनी केले.सुत्रसंचालन तालुका सचीव राजेंद्र शिंगटे यांनी केले ,समारोप व मान्यवरांचेआभार श्री शब्बीरभाई काझी तालुका उपाध्यक्ष यांनी केले. कार्यक्रमांचे व्यस्थापन प्रज्योत डुडु व मोहन पानस्कर यांनी केले. राजमाता जिजाऊ यांचेवर डॉ.थोरात यांनी सुश्राव्य व्याख्यान दिले त्याचप्रमाणे श्री शिंगटे यांनी स्वामी विवेकानंद यांचेवर व्याख्यान दिले.तर श्री बावीस्कर यांनी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी व ग्राहक चळवळ यावर व्याख्यान दिले. यावेळी पत्रकार बॅरिस्टर अभिमन्यू आठवले पत्रकार विलास भोसले पत्रकार प्रमोद शिंदे पत्रकार श्रीराम भगत उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकारी सर्व सदस्यांचा सत्कार करणेत आला.कार्यक्रमाचे नियोजन अमीत शहा व सनी बावीस्कर यांनी केले .

You may have missed