पिरळे-दहिगाव रस्ता बनतोय विद्यार्थ्यांच्या अपघाताचे कारण, बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
एन डी एम जे विद्यार्थी संघटना करणार आंदोलन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे– पिरळे- दहिगाव हा रस्ता खड्ड्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात सध्या कोरोना प्रादुर्भाव सुरू असल्याने दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू आहे पिरळे वरून दहिगाव नातेपुते जाण्यासाठी एसटी नसल्यामुळे विद्यार्थी सायकल वरून शाळेला जातात परंतु या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता सतत खचलेला असतो रस्त्याने जाताना विद्यार्थी व नागरिकांना मोठी जीव घेऊन तारेवरची कसरत करावी लागते अनेकदा या रस्त्याची डागडुजी निकृष्ट दर्जाची व तात्पुरत्या स्वरूपात केली जाते. सतत या रस्त्याचे काम ठेकेदारांना दिले जाते व ठेकेदारांकडून हे काम चांगल्या प्रकारे केले जात नाही सतत रस्त्या मध्ये खड्डे पडतात व रस्ता खचतो या खड्डे भरणे मध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं नागरिकांकडून बोलले जात आहे. पिरळे फोंडशिरस या रस्त्याची सुद्धा तशीच अवस्था आहे गेला महिन्यांमध्येच या रस्त्याचे खड्डे बुजवले आहेत तरीसुद्धा पुन्हा खड्डे पडले आहेत. याला जबाबदार पीडब्ल्यूडी चे अधिकारीच असल्याचं बोलले जात आहे. पिरळे-दहिगाव हा रस्ता सतत वर्दळीचा रस्ता असून नेहमीच वाहनांची ये-जा असते या रस्त्याने जात असताना खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात अपघातामुळे विद्यार्थी व नागरिकांना दुखापत होत आहे भविष्यात या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण?असा सवाल जनसामान्य मधून विचारला जात आहे. तात्काळ रस्ते दुरुस्त करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा एन.डी एम.जे विद्यार्थी संघटनेचे प्रज्ञेश कांबळे यांच्या वतीने करण्यात आला आहे
