नातेपुते नगरपंचायत वर बाबाराजे देशमुख गटाचे वर्चस्व 17 पैकी 11जागांवर विजय

नातेपुते नगरपंचायत वर बाबाराजे देशमुख गटाचे वर्चस्व 17 पैकी 11जागांवर विजय
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)-सोलापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक मानले जाणारे माळशिरस तालुक्यातील नातेपुते नूतन नगरपंचायत पूर्वीची ग्रामपंचायत चे 88 वर्षानंतर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत झाले व सार्वत्रिक निवडणूक 2021-22 साठी निवडणूक धुमधडाक्यात झाली या निवडणुकीत बाबाराजे देशमुख यांच्या जनशक्ती विकास आघाडीला 17 पैकी 11 जागा चे आघाडी मिळाली असून नगरपंचायत वर बाबाराजे देशमुख गटाचे वर्चस्व झाले आहे तसेच ऍड. बी.वाय.राऊत यांच्या नागरी विकास आघाडीचे 5 उमेदवार निवडून आले आहेत व एक उमेदवार अपक्ष निवडून आला आहे. तर इतर पॅनल ला खाते उघडता आले नाही. उमेदवार यादी व पडलेली मते पुढीलपमाणे
प्रभाग क्र १ अतुल पाटील२९०(विजयी) जनशक्ती विकास आघाडी ,राहुल काळे (नागरी विकास आघाडी) २०७, प्रभाग २ संगीता काळे ३१५ (विजयी)(जनशक्ती विकास आघाडी),रत्नप्रभा काळे १११ (नागरी विकास आघाडी), सीमा बाविस्कर ४७ (समाजभुषण पॅनल), प्रभाग क्र ३ सुरेश सोरटे १२३ (विजयी)(जनशक्ती विकास आघाडी), अभिजीत वाळके १०७(अपक्ष) अविराज सोरटे १०१(अपक्ष) हनमंत सोरटे ४१(अपक्ष) सुहास सोरटे ३०(अपक्ष) समीर सोरटे २२(अपक्ष) समीर नलावडे२० (वंचित बहुजन आघाडी), धवल कसबे १७ (अपक्ष)उत्कर्ष सोरटे ६(समाजभुषण पॅनल) शुभम सोरटे २(अपक्ष) प्रभाग ४ क्र भारती पांढरे२६३ (विजयी)जनशक्ती विकास आघाडी ,दिपाली सातपुते ६०(समाजभुषण पॅनल),कोमल पवार ५०(नागरी विकास आघाडी),सुनिता सावंत ३७(वंचित बहुजन आघाडी),प्रभाग क्र ५ मालोजीराजे देशमुख५३३(विजयी)जनशक्ती विकास आघाडी , विजय देवकाते ४६८(नागरी विकास आघाडी),राजदीप देशमुख ४५(अपक्ष),शिवशंकर पांढरे २७(समाजभुषण पॅनल),नयन कुचेकर १०(वंचित बहुजन आघाडी),प्रभाग ६ क्र आण्णा पांढरे२९४ (विजयी)जनशक्ती विकास आघाडी ,सुरेश पांढरे २७५(नागरी विकास आघाडी),दत्तात्रय कचरे ११३(अपक्ष),सलमान शेख १८(वंचित बहुजन आघाडी),प्रदीप ननवरे ६(मनसे),प्रभाग ७ सविता बरडकर२८८(विजयी)नागरी विकास आघाडी ,स्वाती बरडकर २२७(जनशक्ती विकास आघाडी),प्रभाग ८ क्र रणजीत पांढरे २१७ (विजयी) जनशक्ती विकास आघाडी,चंद्रकांत काळे ७९(समाजभुषण पॅनल),अमोल भोसले ५७(अपक्ष), अंकुश कचरे ४३(अपक्ष),दत्तात्रय वायदंडे २१(अपक्ष),पारूबाई बरगडे १५(अपक्ष),विठ्ठल ठोंबरे १४(अपक्ष),शेखर साळवे ०(अपक्ष),प्रभाग ९ क्र दिपक काळे४१३(विजयी)नागरी विकास आघाडी,वैभव कवितके ३१८(जनशक्ती विकास आघाडी,रविंद्र काळे २७(समाजभुषण पॅनल),प्रभाग क्र १० स्वाती बावकर५०१(विजयी)जनशक्ती विकास आघाडी ,पल्लवी माने १४१(नागरी विकास आघाडी),सुनिता बोडरे १११(अपक्ष),रतन सरक ६८(समाजभुषण पॅनल),नंदिनी ठोंबरे २७(अपक्ष),प्रभाग क्र ११ भानुदास राऊत१८८(विजयी)(नागरी विकास आघाडी) ,बाळू बोराटे १३२(जनशक्ती विकास आघाडी), अशोक राऊत ४६(समाजभुषण पॅनल),प्रभाग क्र १२ उत्कर्षाराणी पलंगे३३८(विजयी)(जनशक्ती विकास आघाडी) ,संध्या सोरटे २४२( नागरी आघाडी ),ज्योस्ना साळवे १७ समाजभुषण पॅनल,प्रभाग १३ अनिता लांडगे२९१ (विजयी)जनशक्ती विकास आघाडी ,ज्योती लांडगे १९०(नागरी विकास आघाडी),कोमल साळवे १४८(समाजभुषण पॅनल),प्रभाग १४ शर्मिला चांगण२९७(विजयी)अपक्ष ,अनारकली बागवान १५७(जनशक्ती विकास आघाडी),मंगल इंगोले ९७(अपक्ष),शहीदा काझी ५०(अपक्ष),प्रभाग क्र १५ माया उराडे३५०(विजयी)नागरी विकास आघाडी ,दिलशाद नदाफ ३३०(जनशक्ती विकास आघाडी),प्रभाग क्र १६ राजेंद्र उराडे४१३(विजयी)नागरी विकास आघाडी,अक्षय भांड ४००(जनशक्ती विकास आघाडी),राहुल पदमन ६७(अपक्ष),धवल कसबे ६(अपक्ष),अमोल लंबाते ३(वंचित बहुजन आघाडी),संजय नाचण ०(अपक्ष),प्रभाग क्र १७ दिपिका देशमुख४६५(विजयी)जनशक्ती विकास आघाडी ,ज्योती साळुंखे २३७(नागरी विकास आघाडी),राफिया आतार ११६(समाजभुषण पॅनल),गीतांजली पिंपळनेरकर ४४(वंचित बहुजन आघाडी) अशा प्रकारे मतदान पडलेली उमेदवारांची यादी असूनया निवडणुकीत जनशक्ती विकास आघाडीला एकूण-११ जागा मिळाल्या तर नागरी विकास आघाडीला एकूण-५ जागा मिळाल्याअपक्ष-१ जागा मिळाली असे एकूण 17 उमेदवार निवडून आले आहेत तसेच या निवडणुकी मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने सुद्धा ताकत लावली होती स्वतः रष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेवजी जानकर यांनी प्रचार रॅली काढली होती.तसेच अनेक घटकांना घेऊन राष्ट्रवादीचे नेते धैर्यशील भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समाजभूषण पॅनल च्या माध्यमातून उमेदवार उभे केले होते.परंतु या पॅनला एकही जागा मिळाली नाही तसेच वंचित बहुजन आघाडी व मनसे व अपक्ष उमेदवार यांनीही प्रयत्न केला परंतु त्यांना ही जागा मिळवता आली नाही. या निवडणुकीच्या निकालाचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माधव खांडेकर यांनी चोखा पार पाडली निवडणूक पार पाडण्यासाठी परिसरातील तलाठी प्रशासकीय कर्मचारी व नगर पंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.तसेच पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते व उपविभागीय पोलिस अधिकारी शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय मनोज सोनकर व पोलीस कर्मचारी यांनी पोलिस बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत निवडणूक पार पडली. निवडून आलेल उमेदवारांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळण करून आनंद व्यक्त केला .आता नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या आकर्षण म्हणजे सत्तर वर्षात पहिल्यांदाच वडार समाजाला प्रतिनिधित्व मिळाला आहे त्यामुळे वडार समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

