दहिगाव रोडला घाणीचे साम्राज्य, गटारी तुंबल्या रस्त्यावर कचरा,कचरा कुंडीची नागरिकांची मागणी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी) नातेपुते तालुका माळशिरस येथे दहिगाव रोडवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.तसेच गटारी तुंबल्या आहेत त्यामुळे नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. दहिगाव रोड येथील येथील नागरिकांच्या आरोग्या चा प्रश्न निर्माण झाला आहे.दहिगाव रोडला एक ही कचराकुंडी नसल्याने कचरा टाकण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच रस्त्याचे काम हे अनेक दिवस रखडल्याने गटारी तुंबल्या जात आहेत.तात्काळ कचराकुंडी व गटार सफाई चे काम करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या नगरपंचायत चे इलेक्शन सुरू आहे परंतु कोणाचेही लक्ष या समस्यांकडे नसल्याचे दिसून येत आहे.

