नातेपुते नगरपंचायत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांचे उद्या मतपेटीतून उघडणार नशीब, जनसेवा करण्याची मिळणार सुवर्णसंधी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते प्रतिनिधी : नातेपुते नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 20 22 हे ऐतिहासिक निवडणूक मानली जाते निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांचे नशीब मतदारांच्या हातून उद्या मतपेटीच्या माध्यमातून उघडले जाणार उद्या सकाळी दहा वाजता निकालास प्रारंभ होईल.कोणाचे पारडे जड होणार हा उद्याचा येणारा दिवस सांगू शकेल नातेपुते नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १३ जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून उरलेल्या ४ प्रभागासाठी ‌‌‌‌आज दिनांक १८/०१/२०२२ रोजी ८१.५७ % मतदान ‌‌‌ झालेले आहे ३१८० पैकी २५९४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला‌‌ असून शांततेत व ‌‌‌‌चोख पोलिस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडली
‌‌‌‌प्रभागनिहाय झालेले मतदान खालील प्रमाणे
प्रभाग क्रमांक ( ७ ‌‌‌‌) साठी एकूण पुरुष मतदान 320 पैकी 272 झालेले मतदान,स्त्री एकूण मतदान 285 पैकी 252 झालेले मतदान, या प्रभागात ६०५ पैकी ‌५२४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला 
प्रभाग क्रमांक ( ८ ) साठी एकूण पुरुष मतदान 263 पैकी 225 झालेले मतदान,स्त्री एकूण मतदान 261 पैकी 221 झालेले मतदान व इतर 1 या प्रभागासाठी ५२५ पैकी ‌४४७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
प्रभाग क्रमांक ( ९ ) साठी एकूण पुरुष मतदान 489 पैकी 407 झालेले मतदान, स्त्री मतदान 439 पैकी 356 झालेले मतदान ९२८ पैकी ‌७६३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
प्रभाग क्रमांक ( १० ) साठी एकूण पुरुष मतदान 570 पैकी 443 झालेले मतदान, स्त्री 552 पैकी 407 झालेले मतदान या प्रभागात ११२२ पैकी ‌८६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
उद्या दिनांक १९/०१/२०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. असून सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार.

You may have missed