श्रीकांत बाविस्कर यांच्या सतर्कतेमुळे दहिगाव रोड वरील टळला अनर्थ
पुरोगामी महाराष्ट्र नेटवर प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी) नातेपुते तालुका माळशिरस येथील दहिगाव रोड येथे विद्युत नियामक आयोग मंडळाचे सदस्य महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य संपर्कप्रमुख पत्रकार श्रीकांत उत्तम बाविस्कर यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आहे. यासंदर्भात हकीकत अशी की काल सायंकाळी पाच वाजता दरम्यान उसाचा ट्रॅक्टर ट्रॉली ने दहिगाव रोड वरील असलेल्या विद्युत वितरण च्या विद्युत वाहक तार ओढली गेली. त्यामुळे ती तार खाली लोंबू लागली त्या ताऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह सुरू होतात पाठीमागून येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये वरती काही ऊस तोड मजुर बसले होते व तार खाली लोंबत असलेले अर्थिंगची तार समजून हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात श्रीकांत बाविस्कर यांनी मोठ्याने ओरडून सांगितले त्याला हात लावू नका व ट्रॅक्टर चालक मजूर जागेवर थांबले अन्यथा त्या मजुराचा हात लागून अनर्थ झाला असता तात्काळ घटनास्थळी जाऊन श्रीकांत बाविस्कर यांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली तात्काळ विद्युत वितरण चे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत विद्युत प्रवाह बंद करून लगेच ती तार बांधण्यात आली.स्वतः उभे राहून त्यांनी विद्युत वितरण कर्मचाऱ्यांच्या कडून तार बांधून घेतली. विद्युत वितरण कर्मचाऱ्यांनी सुद्धा आभार व्यक्त केले. त्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ होता होता टळल्यामुळे परिसरात श्रीकांत बाविस्कर यांचे कौतुक होत आहे.

