एन.डी.एम.जे राज्य महासचिव अॅड.डाॅ.केवल उके यांचा महाराष्ट्र भारत विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा
प्रख्यात समाजसेवक अॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचा वाढदिवस समग्र महाराष्ट्रात थाटात संपन्न



पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ठाणे संदेश भालेराव– दिनांक १६ फेब्रूवारी २०२२ रोजी एन.डी.एम.जे. संघटनेच्या मुंबई-ठाणे प्रदेश आणि ठाणे जिल्हा व कल्याण शहर कार्यकारिणीने ॲड.डॉ.केवलजी उके साहेबांचा वाढदिवस श्रीसाई हॉल, वायलेनगर कल्याण पश्चिम या ठिकाणी आयोजित केला होता.
ॲड.डॉ.केवलजी उके यांची एक वेगळी ओळख असून ते महाराष्ट्रातील एक कर्तव्यनिष्ठ व्यक्ती, संकट काळी पीडितांच्या मदतीला धाव घेणारे, गरजूंना मायेची हाक देणारे, अन्याला वाचा फोडणारे, मरेल पण अन्याय-अत्याचाराच्या घटनेत कधीही तडजोड न करणारे, कुठल्याही अमिषाला कधीही बळी न पडणारे, सर्व धर्म समभाव अशी भूमिका घेऊन अन्याय करणाऱ्याना धडा शिकविणारे, महाराष्ट्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व, सामजिक पत्रकारितेमध्ये उत्कृष्ठ बदल घडवणारे, स्वबळावर पत्रकारांची टीम निर्माण करणारे, सोशल न्युज नेटवर्क च्या माध्यमाने सरकार ला धारेवर धरणारे कर्तव्यनिष्ठ पुरोगामी महाराष्ट्र न्युज चॅनल चे संचालक नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस चे राज्य महासचिव महिला बालविकास मार्गदर्शक मंत्रालाईन सदस्य तसेच आपल्या लेखणी ने भ्रष्ट अधिकारी यांची झोप मोडणारे कार्य सम्राट आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती सदस्य, आपल्या कार्याने ओळखले जाणारे, मानवधर्म पाळून लोक हित जपणारे, शेकडो हृदयाचा पाठीराखा, अन्याय अत्याचार ग्रस्त व पत्रकारांच्या व वंचित समाजातील गरजु पिडीतांच्या हाकेला धाव घेणारे कायदेतज्ज्ञ, सुधारित ॲक्ट्राॅसिटी ॲक्ट २०१५ चे जनक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यापार, कला क्षेत्रात बदल घडवणारे कर्तव्यनिष्ठ आदर्श व्यक्तिमत्व, गरजवंतांना प्रगतीचे मार्ग धाकवणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे अॅड.डाॅ.केवल उके साहेब* यांचा वाढदिवस समग्र महाराष्ट्रात थाटात संपन्न झाला.
कल्याण पश्चिमेतील श्री साई हाॅल सभागृहात यावेळेस संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीच्या व वाढदिवसाच्या कार्यक्रमा निमित्त नॅशनल दलित मुव्हमेनट फ़ॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य टिम, पुरोगामी महाराष्ट्र न्युज, नेटवर्क,बहुजन बहुउद्देशीय सामाजिक सांस्कृतिक संस्था ,वंचित बहुजन आघाडी नॅशनल रेल्वे यूनियन चे कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य एन .डी. एम .जे .राज्य सचिव आयु.वैभवजी गिते, न्याय विधी सल्लागार अँड बी.जी.बनसोडे, प्रसिद्ध उद्योजक मा.विनोद जाधव साहेब ऑल इंडिया एस.सी.एस. टी.रेल्वे कर्मचारी संघाचे मुंबई विभाग अध्यक्ष हेमंत जाधव साहेब, एन.डी.एम.जे. मुंबई प्रदेशचे पदाधिकारी ज्यामध्ये अध्यक्ष बंदिश सोनवणे, सचिव शशिकांत खंडागळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष प्राध्यापक विकास चव्हाण सर, जिल्हा सचिव विनोद रोकडे, जिल्हा सह सचिव सुनिलजी ठेंगे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव, कल्याण डोंबिवली एन. डी.एम.जे. जिल्हाअध्यक्ष ॲड.प्रविण बोदडे, संदीप घुसळे, संघटक कोंगळे, बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्थेतील कोषाध्यक्ष नथुराम मोहीते, सुरेश शिंदे, अविनाश बावस्कर, विजय निकाळे, निलेश सपकाळ, बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक कला समिती अध्यक्ष सुप्रसिद्ध गायक सुरेश घोडेराव, मिलिंद वानखडे व पत्रकार गायक व कवी , गौतमराजे व गणेश गायकवाड, एन.डी.एम.जे. माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राजेश साळे एन.डी.एम.जे. तालुका उपाध्यक्ष माळशिरस
सुरज गायकवाड, कारूंडे शाखा अध्यक्ष तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, शहापूर तालुक्यातील अध्यक्ष प्रा.गुरुनाथ कशिवले, सचिव सागर रोकडे, प्रसिद्धीप्रमुख मनोहर गायकवाड, सहसचिव गणेश आहीरे,सतिश गवळी सामाजिक कार्यकर्ते इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम बद्ध वंदना घेउन आणि वाढदिवसाचा केक कापुन शाल व फुलांचा गुच्छ देऊन वाढदिवस संपन्न झाला. मनोरंजनात्मक कार्यक्रम, काव्य, गायन, चारोळी व प्रबोधानपर भाषने सुद्धा झालीत.
कार्यक्रमाचे औचित्य साधून एन.डी.एम. जे. संघटनेचे वार्षिक कॅलेंडर व कार्यकर्ता दैनंदिनी (डायरी) २०२२ याच प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुञसंचालक एन.डी.एम.जे.कल्याण डोंबिवली अध्यक्ष अँड. प्रविण बोदडे सरांनी केले तर आभार प्रदर्शन बंदिश सोनावणे यांनी केले.
अॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचे पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो. आयुष्याच्या या पायरीवर त्यांच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येवो, त्यांच्या इच्छा, आकांक्षा उंच-उंच भरारी द्यावी, यांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय धार्मिक, व्यापार , कला क्षेत्रात प्रगती होवो तसेच तयांच्या कडून शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचे थोर विचार समाजात रुजवावे व आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच तथागता चरणी मंगलमय सदिच्छा व्यक्त करत राज्यच न्हवे तर संपूर्ण देशातुन समाजमाध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. याव्यतिरिक्त, प्रख्यात समाजसेवक अॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचा वाढदिवस सोलापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, पुणे, ठाणे जिल्ह्यासह समग्र महाराष्ट्रात थाटात संपन्न झाला.