नातेपुते ऐतिहासिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी उत्कर्षा राणी उमेश पलंगे तर उपनगराध्यक्ष पदी मालोजीराजे देशमुख


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- नातेपुते येथील ऐतिहासिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी उत्कर्षा राणी उमेश पलंगे तर उपनगराध्यक्षपदी मालोजीराजे शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नातेपुते ऐतिहासिक नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली होती.या निवडणुकीत भाजपचे नेते बाबाराजे देशमुख यांच्या जनशक्ती विकास आघाडी पॅनलचे अकरा नगरसेवक निवडून आले होते. तर माजी सरपंच बी वाय राऊत यांच्या नातेपुते विकास आघाडी पॅनलचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत तर एक अपक्ष नगरसेविका म्हणून निवडूनआले होते.जनशक्ती विकास आघाडी सर्वाधिक अकरा नगरसेवक असल्याने जनशक्ती विकास आघाडीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची बहुमताने निवड करण्यात आली.या जनशक्ती विकास आघाडीला बाबाराजे देशमुख, राजेंद्र भाऊ पाटील, मामासाहेब पांढरे, रघुनाथ कवितके,वामनराव पलंगे, चंद्रशेखर भांड यांचे मार्गदर्शन लाभले आहे सर्व एकत्रित आल्यामुळे एक हाती सत्ता येण्यास यश मिळाले आहे. नगर विकास विभागातराज्य निवडणूक आयोगाने नगराध्यक्ष पदाची सोडत काढली होती.सोडतीमध्ये नातेपुते नगरपंचायत ला नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्ग आरक्षित झाला होता त्यामुळे जनशक्ती विकास आघाडीच्या उत्कर्षाराणी उमेश पलंगे यांनी आपला नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. एकमेव अर्ज असल्याने उत्कर्षा राणी पलंगे ह्या अनुसूचित जाती प्रवर्गातून नगराध्यक्ष झाल्या. तर उपनगराध्यक्षपदी माजी जि.प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांचे चिरंजीव युवा नेतृत्व मालोजीराजे देशमुख यांना एक मताने संधी मिळाली आज फक्त औपचारिकता म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी व नातेपुते नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव खांडेकर यांनी दुपारी तीन नंतर उत्कर्षाराणी उमेश पलंगे यांची नगराध्यक्ष पदी तर उपनगराध्यक्ष पदी मालोजीराजे शहाजीराव देशमुख यांची निवड झाल्याचे जाहीर केले.नातेपुते जन विकास आघाडी पॅनलचे नूतन नगरसेवक ॲड बी वाय राऊत व दादासाहेब उराडे यांच्यावतीने नगराध्यक्ष व नगराध्यक्ष यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.दरम्यान नातेपुते नगरीतून हलगी च्या सहाय्याने वाजवत गुलाल उधळत फटाक्यांच्या आतषबाजीत करत सर्वांची मिरवणूक काढण्यात आली.बाबाराजे देशमुख यांच्या वाड्यावर सर्व नगरसेवक व नगरसेविका यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बाबाराजे बोलताना म्हणाले की लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे.त्यामुळे विकासाची कामे करावी लागणार आहेत.नगर विकास खात्याकडून निधी आणून प्रामुख्याने पाणी, रस्ते व अनेक सुविधांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. लोकांना सुविधा करून देण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करा. नगराध्यक्ष वर्षाराणी म्हणाले की जबाबदारी स्वीकारून जनतेचे प्रश्न सोडवणार .उपनगराध्यक्ष मालोजीराजे म्हणाले की निश्चितच आमची जबाबदारी वाढली आहे आम्ही जबाबदारीने नातेपुते चा विकास करणार यावेळी मामासाहेब पांढरे,माऊली पाटील वामनराव पलंगे,नाथाजीराव देशमुख,भैय्या साहेब देशमुख अर्जुन जठार.शिवाजी राव पिसाळ, उमेश पलंगे, अमरशील देशमुख अतुल पाटील व इतर अनेक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.









