१० रुपयाच्या ठोकळ्याचे शासनाने जनजागृती करणे गरजेचे -हितेश दोशी
पुरोगामी महाराष्ट्रा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)– १० रुपयाचा ठोकळ्या बद्दल लवकरात लवकर शासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे असे शासनाला नातेपुते येथील व्यापारी हितेश दोशी यांनी आवाहन केले आहे.नातेपुते ही मोठी नावाजलेली बाजारपेठ आहे व या बाजारपेठेत बत्तीस खेड्यातील लोक येत असतात.सध्या १०रुपयाच्या ठोकळा बद्दल बाजारात पेठेत ग्राहकांचा गैरसमज पसरवले जात आहे.काही ग्राहक १०रुपयाचा ठोकळा चलनात वापरण्यास तयार नाहीत १० रुपयाचा ठोकळा व्यापाराने दिला तर तो ठोकळा घेण्यास साफ नकार देत आहेत. त्यांच्या मते दहा रुपयाचा ठोकळा चलनातून शासनाने बंद केला आहे.अशी अफवा पसरल्याने ग्रामीण भागातल्या ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दहा रुपयाचा ठोकळ्या बाबत शासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे. याबाबत नगरपंचायतीने सुद्धा जनजागृती करणे गरजेचे आहे असे नातेपुते येथील प्रसिद्ध व्यापारी सन्माती सेवादलाचे सामाजिक कार्यकर्ते हितेश हुकुमचंद दोशी यांनी मत व्यक्त केले आहे.

