आमचा हक्काचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे- डॉ.केवल उके
आमचा हक्काचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे- डॉ.केवल उके
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)
आमच्या हक्काचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे आमचा निधी इतरत्र वळवून नका डॉक्टर केवल उके यांनी पंढरपूर येथे सर्व महापुरुष यांच्या संयुक्त जयंती निमित्त झालेल्या चर्चासत्रात प्रतिपादन केले.नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने महापुरुषांच्या आयुक्त जयंतीनिमित्त राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जरी साजरा करत असलो तरी शासन आमच्या सोबत अजून सुद्धा भेदभाव करत आहे. आमचा हक्काचा निधी इतरत्र वळवला जातो. तो आमच्या हक्काचा निधी आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आहे. त्यासाठी बजेटचा कायदा झाला पाहिजे.आणि या कायद्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. सोमे से पच्चीस हक है हमारा!असा नारा त्यांनी दिला.या कार्यक्रमात राज्य सचिव वैभव गीत बोलताना म्हणाले आमचा निधी धनंजय मुंडे वळवत आहेत. मुख्यमंत्री उच्च दक्षता अधिकार समिती गठित करत नाही.खरोखर शासन आमच्यासोबत भेदभाव करतय कार्यकर्त्यांनी पीडितांच्या पुनर्वसन करण्यावर भरद्यावा. एन.डी.एम जे एकमेव संघटना आहे येथील पीडितांसाठी मंत्रालय व प्रशासकीय स्तरावर मदत करण्याचे काम करते. या कार्यक्रमात सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या महिलांना सावित्री रमाई जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव यांचाही विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच विकास दादा धाईंजे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या. तसेच शिवराम कांबळे ,राष्ट्रवादीच्यानेत्या भालके मॅडम ,माजी नगराध्यक्ष उज्ज्वला भालेराव ,दिलीप आदमाने पंचशीला कुंभारकर, प्रमोद शिंदे ,ऍड सुमित सावंत ,वैभव धाईंजे, अर्चना मस्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संजय झेंडे, वैभव काटे, संजय माखे गावकर,पंकज काटे, वेताळा खरबडे, पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोविंद सावंत,अविनाश ताकतोडे,विशाल ननवरे, लखन सावंत, अनिल नवगिरे, बळीराम वाघमारे, वासुदेव साठे,बबन नवगिरे,परमेश्वर गेजगे, मंगेश ननवरे, रुपेश वाघमारे, स्वप्नील जाधव, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आयोजन रोहित एक मल्ली धनाजी शिवपालक यांनी केले.












