नातेपुते नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी अविनाशभाई दोशी
नातेपुते नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी अविनाश दोशी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे– ऐतिहासिक नातेपुते नगरपंचायतीच्या पहिल्या स्वीकृत नगरसेवक पदी सामाजिक कार्यकर्ते अवी भाई उर्फ अविनाश दोशी यांना संधी मिळाली नातेपुते तालुका माळशिरस येथील 88 वर्षाचे ग्रामपंचायतीचे नगर पंचायती मध्ये विलीनीकरण झाले.पहिल्या नगरपंचायत निवडणुकीत अनुसूचित जाती च्या महिला उमेदवारा साठी नगराध्यक्षपद आरक्षित झाल्याने अध्यक्षपदी उत्कर्षाराणी उमेश पलंगे यांची निवड करण्यात आली.तर उपनगराध्यक्षपदी मालोजीराजे बाबाराजे देशमुख यांची निवड करण्यात आली.तर स्वीकृत सदस्य पदासाठी जनशक्ती विकास आघाडी च्या वतीने अविनाश दोशी यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता.त्यांचा अर्ज वैध झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माधव खांडेकर यांनी अविनाश दोशी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा केली.अविनाश दोशी हे जैन समाजातील पहिले नगरसेवक झाले असून त्यांचे बहुजन समाजासाठी सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. कोरोना काळात दोन महिने त्यांनी गोरगरीब लोकांना घरोघरी अन्न पोचून अन्नदान केले. तसेच नातेपुते नगरी सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुढाकार घेतला ते निसर्गप्रेमी असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व विविध सामाजिक हिताचे उपक्रम राबवले आहेत. निवड झाल्यानंतर माजी जि.प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला त्यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,नगराध्यक्षा उत्कर्षा राणी पलंगे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,माजी सरपंच अमरशील देशमुख, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नगरसेवक दिपाली देशमुख,भारती पांढरे,अनिता लांडगे,संगीता काळे, रणजीत पांढरे, अण्णा पांढरे, सुरेंद्र सोरटे,अतुल बावकर,बाहुबली सेठ शंकेश्वर, संजय कुमार गांधी,संदीप ठोंबरे,नंदू लांडगे, शक्ती पलंगे,डॉक्टर तेजस संकेश्वर, अश्विनी दोशी, विनोद भाई दोशी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


