पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा तसेच विविध क्षेत्रात ल्लेखनीय काम करणार्या मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – नातेपुते येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने नूतन नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक व विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संत गाडगे महाराज छत्रपती शिवाजी महाराज आयुक्त जयंती महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर साहेब, उपनगराध्यक्ष मालोजीराजे उर्फ आबासाहेब देशमुख, माजी सरपंच विद्यमान नगरसेवक बी वाय राऊत, अमरशील देशमुख, अविनाश भाई दोशी,रणजीत पांढरे, नंदू लांडगे,भैय्यासाहेब सोरटे,उद्योजक संदीप सेठ नरोळे ज्ञानेश्वर उराडे राडे,तसेच महाराष्ट्र विद्युत वितरण चे सहाय्यक अभियंता प्रमोद सोनवणे,दीपक कंकाळे,मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे आदी मान्यवर होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी

नगराध्यक्ष उत्कर्षराणी पलंगे बोलताना म्हणाल्या की नातेपुते नगरीचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असेल.

उपनगराध्यक्ष मालोजीराजे बोलताना म्हणाले पुरोगामी महाराष्ट्र हेनेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते त्यांच्या कामात पॉझिटिव्हिटी नेहमी असते.तसेच एपीआय मनोज सोनवलकर पूर्वी महाराज न्यूज ने चांगला उपक्रम राबवला आहे, ज्ञानदीप संस्थेचे संचालक सी.डी ढोबळे सर, संदीप नरोळे अविनाश दोशी, अप्पासाहेब करचे, रंजीत पांढरे यांनी पुरोगामी महाराष्ट्राचे कौतुक करत वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता दीपक कंकाळे यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या

तसेच पत्रकार संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी आप्पासाहेब कर्चे यांची निवड झाल्याबद्दल व सलीम मुलानी यांचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच पोस्टमन सरवदे यांची पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास संभाजी फुले सर,अकबर मुलानी सर,खरात सर,प्रमोद डूडु, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे पत्रकार अभिमन्यू आठवले, सचिन रणदिवे शक्ती भैय्या पलंगे, जमीर मुलानी सचिन झेंडे, सलीम मुलानी, संतोष चव्हाण,राहुल कोळी व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र चे संपादक प्रमोद शिंदे, कार्यकारी संपादक प्रशांत खरात यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतीक कांबळे प्रज्ञा मोरे खरात डेकोरेशन च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.














