पिरळे येथील समता विद्यालयस गट विकास अधिकारी खरात यांची सदिच्छा भेट
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते( प्रतिनिधी)–पिरळे ता माळशिरस येथील समता माध्यमिक विद्यालय व श्री भिवाई देवी ज्युनिअर कॉलेज पिरळे प्रशालेस माळशिरस तालुका गट विकास अधिकारी खरात साहेब व विस्तार अधिकारी कोळेकर यांनी अचानक सदिच्छा भेट दिली.
यावेळी समता माध्यमिक विद्यालय चे चेअरमन महादेव शिंदे व प्राचार्य दीपक शिंदे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच ग्रामपंचायती च्या वतीने शाळेच्या क्रीडांगण वर वृक्षारोपण करण्यात आले.प्राचार्य दीपक शिंदे बोलताना म्हणाले की प्रशाले साठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील यांच्या वतीने नेहमी सहकार्य व मार्गदर्शन होत असते, गटविकास अधिकारी यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल पाहिला व शाळेचे कौतुक केले तसेच शाळेचे प्रशस्त मैदान सुशोभीकरण करण्या संबंधी सूचना मांडल्या व शाळेसाठी मदत करू असे आश्वासन दिले.
सरपंच अलका नरोळे , शाळेचे विश्वस्त दादासाहेब मानसिंग शिंदे संदीप नरोळे,ग्रामपंचायत सदस्य गणेश दडस ,शिवाजी लवटे व दत्तात्रय लवटे तसेच ग्रामसेविका शीला साळवे मॅडम, ग्रामपंचायत तसेच कर्मचारी सर्व शिक्षक उपस्थित होते .


