एन.डी.एम.जे च्या मागणीला यश14 वित्त आयोगातून पिरळे येथील समाज मंदिर सुशोभिकरण काम सुरू


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- पिरळे तालुका माळशिरस येथील बौद्ध वस्ततील समाज मंदिर  सुशोभीकरण व दुरुस्ती एन.डी.एम.जे च्या मागणीला यश आले असून ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने 14 वित्त आयोगातून समाज मंदिर शोभे करणाचे काम सुरु करण्यात आले.दिनांक 26 जानेवारी रोजी एन.डी.एम.जे च्या वतीने मोडकळीस आलेले समाज मंदिर तात्काळ दुरुस्त करून सुशोभीकरण करण्यात यावे.अशी मागणी प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे व समाज बांधव यांच्या कडून ग्रामपंचायत यांच्याकडे  निवेदनाद्वारे करण्यात आली होती. हे समाज मंदिर वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी बांधले असून त्याची दुरावस्था झाली होती.या समाज मंदिरात महापुरुषांच्या जयंती असे अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात.

रत्नत्रय इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये आजच प्रवेश घ्या मर्यादित प्रवेश

या समाज मंदिरात परदेशी धातूची संगमरवरी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर तात्काळ समाज मंदिर दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत यांच्याकडे करण्यात आली होती.यावर सरपंच,उपसरपंच ग्रामसेवक व सर्व सदस्य यांनी दखल घेत.समाज मंदिर दुरुस्त करण्याचा निर्णय घेत संदीप नरोळे व मान्यवर यांच्या हस्ते नारळ फोडून दुरुस्तीचा शुभारंभ केला.यावेळी उद्योजक सरपंच संदीप सेठ नरोळे,उपसरपंच उमेश भैय्या खिलारे, ग्रामसेविका शैला साळवे मॅडम, सरपंच महादेव शिंदे,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लवटे-पाटील,सुनील दडस,बाळू शिंदे पांडुरंग साळवे,दत्तात्रेय लवटे,राजेंद्र बल्लाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी संदीप नरोळे म्हणाले की गावच्या विकास कामांसाठी हयगय केली जाणार नाही.गावातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून, प्रसंगी आमदार फंड ,खासदार फंड ची मोठ्याप्रमाणात मागणी करून राहिलेली विकास कामे झपाट्याने करणार आहोत. सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

2
1