अकलूज येथील डॉक्टर इनामदार देव माणसाच्या अश्विनी हॉस्पिटल मानवता मंदिराचा आज वर्धापन दिन वर्धापन दिनानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा


 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम. के. इनामदार या देव माणसाच्या अश्विनी हॉस्पिटल मानवता मंदिराचा आज वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने डॉक्टर एम के इनामदार डॉक्टर अनिकेत इनामदार व अश्विनी हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी यांना प्रमोद शिंदे व पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

डॉक्टर एम के इनामदार हे गेल्या 40 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तसेच सांगली, सातारा, सोलापूर, पुणे अशाअनेक जिल्ह्यातील पीडित रुग्णांवर यशस्वी पणे उपचार करून त्यांची अविरत पणे सेवा करून आज पर्यंत हजारो रुग्णांना जीवनदान दिले आहे त्यामुळे येथील लोक त्यांना माणसातील देव मानतात जर कोणी मला विचारलं तुम्ही देव पाहिला का तर मी सांगेल हो मी दगडाचा नाही तर जिवंत देव माणूस पाहिला आहे ते पण डॉक्टर एम के इनामदार यांच्या स्वरूपात

अकलूज मध्ये अश्विनी हॉस्पिटल च्या माध्यमातून गेली  40 वर्ष विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या लोकांवर अश्विनी हॉस्पिटल मध्ये ईलाज केला जातोय.

चाळीस वर्षापासून डॉक्टर इनामदार रुग्णसेवा करीत आहेत. चाळीस वर्षापासून त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ सुद्धा काम करत आहे क्रिटिकल रुग्णांसाठी खात्रीदायक हॉस्पिटल म्हणजे अश्विनी हॉस्पिटल हे पश्चिम भागातील एकमेव हॉस्पिटल आहे.

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा प्रवेश मर्यादित

या हॉस्पिटल ची सुरुवात छोट्याशा जागेमध्ये करण्यात आली होती आता भव्य भलीमोठी इमारत अत्याधुनिक सोयल युक्त व रुग्णांसाठी 24 तास माफक दरामध्ये सेवा या ठिकाणी दिली जाते पुणे मुंबई सारख्या सुविधा या हॉस्पिटलमध्ये अतिशय मापक दरामध्ये दिल्या जातात प्रत्येक रुग्णांची वैयक्तिक रित्या डॉक्टर एम के इनामदार व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे डॉक्टर अनिकेत इनामदार साहेब हे दोघेही पिता-पुत्र रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत डॉक्टर एम के इनामदार हे हृदय रोग तज्ञ तसेच M.D.,FACC,FSAI,FEAC,FISC,FIMAMS आहे तर

डॉक्टर अनिकेत इनामदार M.D.(Med)D.C.C critical care consultant आहेत डॉक्टर अनिकेत इनामदार यांना लहानपणापासूनच डॉक्टर एम के इनामदार यांच्याकडून रुग्णसेवेचे धडे मिळाले आहेत

त्यामुळे ते उत्तम रित्या रुग्णसेवा देत आहेत. ऋग्नसेवा बरोबर समाज सेवेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो सढळ हाताने ते अनेक गरजू लोकांना माणुसकीच्या नात्याने मदत करत असतात परस्थिती नसलेल्या गरीब रुग्णांना बिलामध्ये सवलत दिली जाते. आपुलकीने ऋग्नसेवा देणाऱ्या डॉक्टर इनामदार व अश्विनी हॉस्पिटल मधील सर्व परिवारास पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा

You may have missed