फुलेनगर येथे अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत तुकाराम महाराज महाबीज उत्सव संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी ) –फुलेनगर दहिगाव येथे अर्जुंसिंह मोहिते पाटील व वैष्णवी देवी मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज महाबीज उत्सव संपन्न झाला.सालाबाद प्रमाणे फुलेनगर फुलेनगर येथे तुकाराम बीजउत्सव संपन्न झाला या उत्सवास 42 वर्ष  पूर्ण झाली असून. या कार्यक्रमाची सुरुवात नातेपुते येथील माजी सरपंच व नगरपंचायत चे नगरसेवक ऍड बी वाय राऊत यांच्या हस्ते ध्वज पूजन करून सुरुवात करण्यात आली.

दैनंदिन सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहा, तसेच गाथा पारायण, हरिपाठ ,कीर्तन पहाटे काकड आरतीचे आयोजन केले गेले होते.परंपरेने या कार्यक्रमाची सुरुवात ह.भ.प बाबा काळे महाराज व ह.भ.प रामानंद महाराज दसुरकर यांनी केली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे.

या बीज सोहळ्यास माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील व माजी सभापती वैष्णवी देवी मोहिते-पाटील,सरपंच रणधीर पाटील,उदयसिंह पाटील,शरद मोरे, संदीप सावंत, धनंजय महाराज कदम ,भीमराव फुले,तसेच दहिगाव व पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. अर्जुनसिंह मोहिते पाटील त्यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज यांची महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमास पंचक्रोशीतून हजारो भाविक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ, महात्मा फुले तरुण मंडळ,यांच्यावतीने करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वामन महाराज फुले,अशोक महाराज फुले, ज्ञानेश्वर महाराज फुले,धनंजय महाराज कदम,संभाजी महाराज फुले सर,हनुमंत महाराज फुले सर,विजय महाराज फुले,मारुती फुले,मेजर आजिनाथ फुले,भाऊसाहेब फुले,भाऊसाहेब भिसे तसेच भजनी मंडळ व कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.

You may have missed