जातीय अत्याचारआतील सहा सहकुटुंब यांना नोकरी मिळवून दिल्याबद्दल होलार समाजाच्या वतीने वैभव गीते यांचा सत्कार
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील जातीय अत्याचारात बळी पडलेल्या सहा कुटुंबांना शासकीय नोकरी मिळवून दिल्याबद्दल एन डी एम जे चे राज्य सचिव वैभव गिते यांचा होलार समाजाच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी वैभव गीते बोलताना म्हणाले की ऍड डॉ केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटपर्यंत वंचित शोषित घटकाला जिवंत असेपर्यंत न्याय मिळवून देणार.हे काम कार्यकर्त्यां शिवाय शक्य नाही. या अगोदर सुद्धा आपण 112 लोकांना पाचशे स्क्वेअर फुट जागा घर बांधण्यासाठी मिळवून दिली आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील सातारा कुटुंबीयांना व कोल्हापूर जिल्ह्यातील 9 कुटुंबीयांना पाच हजार रुपये पेन्शन मंजूर करून देण्यास यश आले आहे.

या अगोदर सुद्धा अनेक जाती अत्याचाराला बळी पडलेल्या लोकांना जमीन,पेन्शन,नोकरी मिळवून देऊन पुनर्वसन केले आहे.आणि यापुढेही अशाच प्रकारचं काम सुरू राहील.यावेळी ऍड.अमोल सोनवणे यांची विशेष सरकारी वकील नियुक्ती झाल्याबद्दल व ऍड किरण शिंदे यांची बारामती बार असोसिएशन उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ,ऍड.बापूसाहेब शीलवंत यांनी पीडितांना मदत केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी बारामती,फलटण,नातेपुते, वालचंदनगर,इंदापूर,पंढरपूर तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
