जातीय अत्याचारातील सहा कुटुंबीयांना नोकरी मिळवून दिल्याबद्दल एन.डी.एम.जे.ठाणे जिल्ह्याच्या वतीने डॉ.केवल उके व वैभव गीते यांचा करण्यात आला सत्कार …
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी)- संदेश भालेराव
जिल्ह्यातील जातीय अत्याचारात बळी पडलेल्या सहा कुटुंबांना शासकीय नोकरी मिळवून दिल्याबद्दल एन डी एम जे चे राज्य महासचिव मा.अॅड.डाॅ.केवलजी उके राज्य सचिव मा.वैभवजी गिते यांचा ठाणे जिल्हाअध्यक्ष मा.विजय काबंळे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष मा .ॲड.प्रविण बोदडे यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी वैभव गीते बोलताना म्हणाले की आदरणीय ॲड. डॉ. केवलजी उके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेवटपर्यंत वंचित शोषित पिडीत घटकाला जिवंत असेपर्यंत न्याय मिळवून देणार.
हे काम कार्यकर्त्यां शिवाय शक्य नाही. या अगोदर सुद्धा आपण ११२ लोकांना पाचशे स्क्वेअर फुट जागा घर बांधण्यासाठी मिळवून दिली आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील १७ कुटुंबीयांना व कोल्हापूर जिल्ह्यातील ९ कुटुंबीयांना पाच हजार रुपये पेन्शन मंजूर करून देण्यास यश आले आहे.
या अगोदर सुद्धा अनेक जाती अत्याचाराला बळी पडलेल्या लोकांना जमीन,पेन्शन,नोकरी मिळवून देऊन पुनर्वसन केले आहे.आणि यापुढेही अशाच प्रकारचं काम सुरू राहील.
यावेळी मुंबई प्रदेश सचिव मा.शशिकांत खंडागळे मुख्मंत्री ग्राम विकास योजने अंतर्गत मु. कारखेल पो. धामणगाव ता. आष्टी जी. बीड या ठिकाणी रोड चे काम सुरू झाले तीन वर्षा पुर्वी ऐन डी एम जे ने या संधर्भात मुख्यमंत्री यांना ऐक निवेदन सादर केले होते झाल्याबद्दल सत्कार केला.
व मुंबई प्रदेश संघटक मा शशिकांत वाघ, यांनी पीडितांना मदत केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला .
यावेळी ठाणे जिल्ह्यातील कर्तव्यनिष्ठ उत्कृष्ट प्रसिद्धीच काम मा.संदेश भालेराव हे करत आहेत म्हणून त्यांचा ही सत्कार करण्यात आला यावेळी एन.डी.एम.जे.मुंबई प्रदेश सचिव मा.शशिकांत खंडागळे ,संघटक शशिकांत वाघ, ठाणे जिल्हा एन.डी.एम.जे.अध्यक्ष मा.विजय काबंळे ,क.डो.जिल्हा एन.डी.एम.जे.


अध्यक्ष ॲड. प्रविण बोदडे,ठाणे जिल्हा एन.डी.एम.जे.प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव, आपला संवाद न्युज चॅनल चे संपादक मा.किरण किरतकुडवे, मा.ज्योती किरतकुडवे आणि मा.अभिषेक जाधव तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते
