नातेपुते नगरपंचायत च्या वतीने 2.40 कोटी च्या विकास कामांचे उद्घाटन

नातेपुते नगरपंचायत च्या वतीने 2.40 कोटी च्या विकास कामांचे उद्घाटन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- नगरपंचायत च्या वतीने 2.40 कोटीच्या विकास कामांचे उद्घाटन व पूजन माजी जि.प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटनाची सुरुवात नगरपंचायत च्या समोर स्वच्छ सुंदर नातेपुते या उपक्रमाच्या माध्यमातून सुका व ओला कचरा वेगळा करण्यासाठी सफाई कर्मचारी यांच्याकडे अडीच लाख रुपये किमतीचे 15 अत्याधुनिक प्रत्येकी सहा डबे आलेल्या कचरा घंटा हातगाड्या देण्यात आल्या.

तसेच शासनाकडून पालखी मुक्काम गावासाठी अध्यावत सुविधा असलेले बाजारतळ येथे 20 युनिट चे भव्य सौचालय व पालखी मैदान येथे 20 युनिटचे शौचालय मंजूर झाले. असून त्याचा भूमिपूजन व पालखीतळ विकास योजनेअंतर्गत 35 लाख रुपये किमतीचे 10 हायस्ट लॅम्प बसवून तसेच नातेपुते नगर पंचायत स्वागत फलक त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच या कार्यक्रमादरम्यान शिंगणापूर पाटी ते नातेपुते गावातून जाणारा प्रमुख रस्ता बायपास रोड पर्यंत हा रस्ता केंद्र शासनाकडे वर्ग करण्यात यावा तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात यावा अशी मागणी नगरसेवक ऍड बी.वाय राऊत व नागरिक यांच्याकडून मुख्य अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

यावेळी माजी जि.प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,मुख्य अधिकारी माधव खांडेकर,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, बांधकाम विभाग सभापती अतुल पाटील माजी सरपंच तथा नगरसेवक ऍड बी. वाय.राऊत ,दादासाहेब उराडे ,अविनाश भाई दोशी ,उद्योजक अतुल बावकर, शक्ती भैय्या पलंगे,नगरसेवक रंजीत पांढरे,सुरेंद्र सोरटे,अण्णा पांढरे,दीपक काळे तसेच ज्येष्ठ ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत आनंद लोंढे मनोज राऊत आनंद जाधव सचिन रणदिवे व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.







