बजेटचा कायदा करावा म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना एन.डी.एम.जे संघटनेचे निवेदन
बजेटचा कायदा करावा म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना एन.डी.एम.जे संघटनेचे निवेदन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिल्ली
राजस्थान सरकारने नुकताच बजेटचा कायदा मंजूर केला असून महाराष्ट्रात सुद्धा बौद्ध,अनुसूचित जाती अनुसूचित जमातींच्या योजनांचा प्रगतीचा हक्काचा निधी वळवू नये म्हणून बजेटचा कायदा करावा याकरिता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रात्री उशिरा दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले.


नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके,राज्य सचिव वैभव गिते,राज्य संघटक पंचशीलाताई कुंभारकर यांनी महाराष्ट्रातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत योजनांची अधोगती अंमलबजावणीमधील अडथळे त्यामधील जाचक अटी आणि त्रुटी याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी सखोल चर्चा केली.आणि बजेटचा कायदा जर संसदेने मंजूर केला तर भारतभर लागू होईल आणि सर्व राज्यांवर बंदधनकारक असेल म्हणून निधी वळवू नये,निधी अखर्चित ठेऊ नये म्हणून संसदेत चर्चा करून बजेटचा कायदा मंजूर करण्याची मागणी करून महाराष्ट्र शासनास देखील निर्देश द्यावेत अशी महत्वपूर्ण मागणी एन.डी.एम.जे संघटनेच्यावतीने शिष्टमंडळाने केली.
