मा.नितीनजी करीर महसूल सचिव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन
मा.नितीनजी करीर महसूल सचिव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन
माळशिरस तालुक्यातील विविध प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच कटिबद्ध राहणार राजकुमार हिवरकर पाटील
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग तथा पालखी महामार्ग क .965 चे काम चालू आहे . या कामामध्ये शासकिय तसेच हायवेचे अधिकरी कॉन्ट्राक्टर भौगोलिक परिस्थिीचा विचार न करता काही गावे हायवे ना जोडता ती खंडित केलेली आहेत नातेपुते मांडवे रस्ता हा ब्रिटीश कालीन असल्याने नातेपुतेला जेथे जोडला जातो त्याठिकाणी तो खंडीत करण्यात आला आहे.


त्यामुळे शेतकरी विदयार्थी त्या परिसरात राहण्या – या लोंकाना पर्यायी मार्गाचा वापर करवा लागणार आहे बायपासला भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल केल्यास हे अंतर 5 कि.मी. येणार आहे . हा बायपास नेमका कुणाच्या हितासाठी आहे हा जनतेच्या मनात प्रश्न आहे.पुरंदावडे येथील 94 / 260 मध्ये उड्डाण पुल किंवा भुयारी मार्ग करण्यात यावा वरिल चैनेज मध्ये गावाच्या उजव्या बाजूला मुस्लीम दफन भुमी आहे डाव्या बाजूला हिंदूची स्मशान भूमी आहे . एखादा नागरिक मुत्यु झाल्यास अंत्यविधी करणे हे भुयारी मार्ग नसणे अडचणीचे ठरत आहे



तरी काम चालू आहे तोपर्यत भुयारी मार्ग केल्यास त्या ठिकाणी जि.प.प्राथमिक शाळा सुध्दा आहे त्यांचा येण्या जाण्याचा प्रश्न सुटेल . नातेपुते येथील बायपास शहराच्या 5 कि.मी बाहेर गेल्याने येथील जुना पालखी मार्ग नादरुस्त अवस्थेत आहे पूर्वीच्या ग्रामपंचायतीने या कोणत्याही गोष्टींचा भविष्यातील विचार न केल्याने खड्ड्याचे सांम्राज्य झाले आहे . तो तात्कातळ दुरुस्ती करुन खुला करुन द्या . नातेपुते बायपास ते नातेपुते शहराला जोडणा – या सर्व रस्त्याचे डांबरीकरण व्हावे . नातेपुते पालखी महामार्गावरील मा . नितिन गडकरी साहेबांच्या डिम प्राजेक्ट मधील सायकल ट्रॅक जुन्या महामार्गाच्या बाजूने तयार करण्यास वरील कंपनीस आदेश देण्यात यावेत . जुन्या महामार्गावर स्ट्रीट लाईट लावून मिळावेत.

तालुक्यातील महसुली सज्जावर तलाठी व कोतवाल दिवसभर उपलब्ध व्हावेत . तलाठी तालुक्याच्या गावी गेलातरी कोतवाला मार्फत नागरीकाची कामे मार्गी लागतील. ज्या गावासाठी महा ई सेवा केंद्र मंजूर आहेत ते केंद्र त्याच गावा मध्ये चालू असावेत त्यामुळे नागरिकाची सोय त्याच ग्रामीण भागमध्ये होईल बहुताशी महा ई सेवा केंद्र ग्रामीण भाग सोडूण भलत्याच ठिकाणी चालू आहेत.माळशिरस तालुक्यातील सेतू सेवा केंद्र हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षास चालवण्यास मिळावे त्यासाठी कायदेशीर दस्तवेज पुर्ण करुण ते नांगरिंकासाठी मोफत चालवली जातील अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील यांनी मा नितीनजी करीर महसूल सचिव, राजेश कुमार अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास विभाग व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले यावेळी प्रकाशबापू पाटील यांच्यासह तालुका जिल्हा प्रशासन उपस्थित होते

अशी माहिती राजकुमार हिवरकर पाटील यांनी दिली
