जो समाज राज्य घटनेकडे दुर्लक्ष करेल त्यांना कधीच भविष्य मिळणार नाही- प्रा उत्तम कांबळे

जो समाज राज्य घटनेकडे दुर्लक्ष करेल त्यांना कधीच भविष्य मिळणार नाही- प्रा उत्तम कांबळे 

पुरोगामी महाराष्ट्र योजना नातेपुते (प्रतिनिधी)नातेपुते तालुका माळशिरस येथील नागलोक विचार  मंच यांच्यावतीने महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्राध्यापक उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

त्यादरम्यान प्रा उत्तम कांबळे म्हणाले की जो समाज राज्य घटनेकडे दुर्लक्ष करेल त्यांना कधीच भवितव्य मिळणार नाही. कोणत्याही आरक्षणासाठी राज्यघटना ही महत्त्वाची असते आणि राज्यघटनेनुसार प्रत्येक घटाला आरक्षण मिळाला आहे. आणि मिळतात राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत सर्व घटकांना आणले आहेत त्यामुळे सर्व घटना घटकांनी राज्यघटनेचा अभ्यास केला पाहिजे.राज्यघटना ही बाबासाहेबांनी दिलेलं नगंजनारे हत्यार आहेत. बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना आपल्या गुरुस्थानी मानले आहे .धर्मानी माणसाला गुलाम केले आहे.

तसेच धर्माचा मनोरा हा सीडी बंद आहे त्याकाळी गुलामांना कसलीही प्रतिष्ठा नव्हती ओबीसींनी मनुस्मृति वाचावी मनूच्या मते सर्व ओबीसी शूद्र आहेत.अशा प्रकारे त्यांनी आपल्या या शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले . तसेच याप्रसंगी लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील रीडिंग क्लब च्या वतीने महाविद्यालयामध्ये ग्रंथ दान उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत कोळेकर सर हे होते.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व नागलोक विचारमंच प्रतिष्ठान चे प्रमुख एन के साळवे यांनी केले होते.कार्यक्रमास नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर, प्रा सरुडकर सर, जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष रणजीत कसबे, समीर सोरटे,ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत, श्रीकांत बाविस्कर,प्रमोद शिंदे,सचिन रणदिवे,मुख्याध्यापक आखाडे सर,तसेच प्राध्यापक वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरुडकर सर यांनी केले.आभार सुचित साळवी यांनी व्यक्त केले.

You may have missed