डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून नायब तहसीलदार झालेले प्रतीक आढाव आमच्या समाजाचीशानआहे- राज्य सचिव वैभव गीते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)-कारुंडे ता माळशिरस नुकतेच राज्यसेवा परीक्षा पास होऊन नायब तहसीलदार पदी विराजमान झाले प्रतीक आढाव यांचा नागरी सत्कार समारंभाचा कार्यक्रम एन डी एम जे संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता

. याप्रसंगी एन डी एम जे चे राज्य सचिव वैभव गिते बोलताना म्हणाले की प्रतीक आढाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श मानून नायब तहसीलदार झाले आहे आहे ते आमच्या समाजाची शान आहे त्यांनी खडतर परिश्रम घेऊन हे यश संपादन केले आहे.

पुढे ते म्हणाले की ज्या वेळेस तुम्ही खुर्चीवर बसला तेव्हा प्रामुख्याने गरीब वंचित लोकांचे प्रश्न सोडवा वृद्ध व सामान्य माणसांना सन्मान देऊन सौजन्याने वागवा तुम्ही मानाचा व मोक्याच्या जागेवर गेल्यामुळे आम्हाला व समाजाला प्रचंड आनंद झाला आहे तसेच पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे, विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे कुमार लोंढे ऍड सुमित सावंत ऍड वैभव धाईंजे ऍड विशाल साळवे रोहित एकमल्ली सु ग साबळे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांची खांद्यावर घेऊन कारुंडे तेथे ढोल ताशे व डीजे च्या तालावर मिरवणूक काढण्यात आली.

तहसीलातला मोठा नायब झाला या गाण्यावर पुन्हा नायब तहसीलदार प्रतीक आढाव व कार्यकर्ते यांनी जल्लोष केला. यावेळी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच सुरज गायकवाड यांच्या मुलाचे नामकरण करण्यात आले सुरज गायकवाड यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त नूतन नायब तहसीलदार यांचा सत्कार व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश गायकवाड, नाना गायकवाड ,सुरज गायकवाड ,अनिल गायकवाड व कारुंडे येथील एन डी एम जे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

You may have missed