मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची १९७ वी जयंती उत्साहात साजरी.
“मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची १९७ वी जयंती उत्साहात साजरी.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क– मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची १९७ वी जयंती संघटनेच्या कार्यालयात नऊदारे येथे ३१ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता उत्साहात साजरी करण्यात आली.




यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल केंगार, शिष्टाचार समतीचे नागेश भोसले, ॲड.मंगेश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ भोसले, धडाडीचे कार्यकर्ते शुभम सुर्वे, क्षितीज वनसाळे, आप्पा सो कदम,मिलिंद भोसले, दत्तात्रय राक्षे,विशाल धिमधमे, सौरभ धनवडे उपस्थित होते.
यावेळी सुरज वनसाळे, मंगेश लोंढे, अनिल केंगार यांची भाषणे झाली तर सुत्रसंचलन शुभम सुर्वे यांनी केले.