नातेपुते पोलिसांनी आंतर जिल्हा दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या


  • *नातेपुते येथे आंतरजिल्हा दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 30 हजार रुपये किमतीची एक मोटरसायकल केली हस्तगत*
  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-नातेपुते नजीक दहिगाव येथील चंद्रकांत डोईफोडे यांच्या घरी झालेल्या दरोड्यातील दरोडेखोरांचा तपास नातेपुते पोलिसांनी केला असून  गुन्हा रजिस्टर नंबर 400/2021 भादवि कलम 394,34 प्रमाणे दिनांक 8 /2 /20 21 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्याचा तपास करून नातेपुते पोलीस ठाण्याचे एपीआय मनोज सोनवलकर व पोलीस कर्मचारी यांनी आंतरजिल्हा दरोडा टाकणारी टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व तीस हजार रुपये किमतीचे एक मोटारसायकली जप्त केल्याची कामगीर केली आहे.
  • सविस्तर हकीकत अशी की जिनपूरी,गुरसाळे ता माळशिरस जि सोलापूर गावात राहणारे इसम सिताराम वाल्मीक वाघमारे हा नातेपुते पोलीस ठाणे ठाण्याच्या हद्दीत बाहेरून दरोडेखोर बोलून चोरी करीत आहे अशी बातमी मिळाल्याने नातेपुते पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल 211राहुल रणवरे,850 नवनाथ माने,1636जावेद  जमादार,1038 अजित कडाळे, 945सचिन कांबळे या टीमने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून कौशल्याने तपास करून सिताराम वाल्मीक वाघमारे राहणार जीनपुरी गुरसाळे व त्याचे साथीदार गजानन किसन जाधव राहणार कळंब तालुका इंदापूर, दीपक शंकर मदने राहणार इनाम वस्ती गुरसाळे, संजय लक्ष्मण बनसोडे राहणार मांडवे तालुका माळशिरस, विक्रम तुकाराम आगवणे राहणार निंबोरे तालुका फलटण, ॲक्शन उर्फ तंबी अँथोनी पॉल जीवीवर राहणार स्टेट बँक पाठीमागे गजानन सोसायटी साई नगर देहू रोड राजवाडा चौक पुणे व अरबाज युसुफ खान राहणार लायन्स क्लब शीतल नगर देहू रोड पुणे यांनी केशर चंद्रकांत डोईफोडे राहणार दहीगाव तालुका माळशिरस यांच्या घरी वीस लाख रुपये असून घरामध्ये वयस्कर दोनच व्यक्ती असल्याची माहिती घेऊन त्यांना बोलून घेऊन सिताराम वाघमारे व इतर सदस्यांनी मिळून माहे डिसेंबर 2021 मध्ये दहीगाव कुरबावी  रोडवर असलेल्या घराचे टेरेस वर चढून टेरेस वरील दरवाजा उघडून आत मध्ये प्रवेश करून दोन्ही वयस्क दांपत्यास यांना चाकूचा धाक दाखवून केसर डोईफोडे यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण मनी मंगळसूत्र कानातील कर्णफुले असे साधन 26 ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम 46 हजार रुपये असा एकूण एक लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून घेऊन गेले होते सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सिताराम वाघमारे व इतर साथीदार यांनी सदर गुन्ह्यात अटक करून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मला पैकी पंचेचाळीस हजार रुपये किमतीची दीड तोळा वजनाचे सोन्याचे गंठण वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्हा करतेवेळी आरोपीने वापरलेली तीस हजार रुपये किमतीची शाईन मोटरसायकल जप्त करण्यात आले सदर गुन्ह्यात आंतर जिल्ह्या दरोडेखोर ॲक्शन उर्फ तंबी अँथोनी पॉल जीविअर रा.स्टेट बँक पाठीमागे गजानन सोसायटी साई नगर देहू रोड राजवाडा चौक पुणे व अरबाज युसूफ खान राहणारा लायन्स क्लब शितल नगर देहू रोड पुणे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने व ते सध्या येरवडा कारागृह पुणे येथे जेरबंद असल्याने त्यांना वर्ग करून सदर गुन्ह्यात अटक करण्याची कारवाई चालू आहे.सदर कामगिरीही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम ,अप्पर जिल्हा अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग डॉ. बसवराज शिवपुजे  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसई तानाजी पवार,मपोसई ज्योती बैनवाड,अनिल गडदे, नवनाथ माने, जावेद जमादार,सचिन कांबळे, अजित कडाळे, यांनी केला असून सदर गुन्ह्याचे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर हे करीत आहे.
नातेपुते पोलिसांनी आंतर जिल्हा दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या
नातेपुते येथे आंतरजिल्हा दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 30 हजार रुपये किमतीची एक मोटरसायकल केली हस्तगत*

You may have missed