स्विफ्ट डिझायर कार व टँकरच्या अपघातात दोघे जखमी
स्विफ्ट डिझायर कार व टँकरच्या अपघातात दोघे जखमी
पुणे सोलापूर महामार्गावर डाळज नं.२ चौकातील घटन
पुरोगामी महाराष्ट्र न्यु नेटवर्क इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धावत्या स्विफ्ट डिजायर कारची दूध डेअरीच्या बल्कर टँकरला धडक बसून सोमवारी हा अपघात झाला आहे. हा अपघात सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सोलापुर-पुणे महामार्गावर डाळज नं.२ चौकामध्ये घडला. या अपघातात रोहन रामलिंग गादेकर (वय २७ वर्षे रा. कारी ता. बार्शी जि. सोलापूर) व कार चालक आप्पासो रामलिंग कदम (वय ३८ वर्षे रा. बार्शी ता.बार्शी जि.सोलापूर) यांचे छातीस गंभीर दुखापत झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सोलापुर-पुणे महामार्गावर स्विफ्ट डिझायर कार एम.एच.१२ पी.क्यू. ६६८४ ही पुणे बाजूकडून सोलापूर दिशेने निघाली होती. डाळज नं.२ चौकात नेचर डिलाईट डेअरी चा टँकर क्रमांक एम.एच.१२ एच.डी.२२४२ हा कळस बाजूकडे रस्ता क्रॉस करत असताना त्यास वेगात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारची धडक बसली.

अपघात घडताच स्थानिक नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. स्विफ्ट डिझायर कार मधील 4 जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी खासगी वाहनाने भिगवण आय.सी.यू.रुग्णालयात येथे पुढील उपचार कामी पाठवले.या अपघातात अजित भागवत करळे (वय 30 वर्षे) व सोलापूर चंद्रकांत एकनाथ गादेकर (वय 31) दोघेही रा. कारी ता. बार्शी जि. सोलापूर हे सुखरूप असल्याचं भिगवण आय सी यु चे डॉ.पवार यांनी सांगितले.

घटना समजताच महामार्ग पोलीस मदत केंद्र इंदापूरचे सहा.पोलीस उपनिरीक्षक महावीर कांबळे, पो.हवालदार नवनाथ कदम, बाळासाहेब काळे,पो.नाईक कुलदीप फलफले यांनी भेट दिली. यावेळी अपघात ठिकाणी एन.एच.ए.आय.चे कर्मचारी ही हजर होते.
