पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चा बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न


डॉ. केवल उके, मा आमदार रामहरी रुपनवर ,आमदार राम सातपुते शिवअमृत दूध संघ चेअरमन धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते-पाटील ,चळवळीचे नेते विकास दादा धईंजे राज्य सचिव वैभवजी गीते कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे नगराध्यक्षा उत्कर्ष राणे पलंगे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थित

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी) पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल चा तृतीय वर्धापनदिन तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व सर्व महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त ऑनलाइन चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.


या कार्यक्रमाचे उद्घाटन पुरोगामी महाराष्ट्र चे संचालक, एन डी एम जे राज्य महासचिव आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती सदस्य महाराष्ट्र शासन डॉ केवल उके, विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर, शिवामृत दूध संघ चेअरमन धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते-पाटील, विकास दादा धाईंजे, राज्य सचिव वैभव गिते,धैर्यशील भाऊ देशमुख, रिपाई राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार,डॉ अनिकेत इनामदार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ने झाडे लावा झाडे जगवा,अभियानांतर्गत सुमारे दीड लाख वृक्ष लागवड केली असून बेटी बचाओ बेटी पढाओ,माझी वसुंधरा, कोरोना व पूरग्रस्तांना मदत महापुरुषांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गणवेश वाटप मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक मान्यवरांच्या कडून करण्यात आले.

या
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार रामभाऊ सातपुते, नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, विशेष सरकारी वकील सोनवणे रिपाई राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,पंचायत समिती सदस्य अजय सकट,महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे नागेशजी बनसोडे उमेश पलंगे,ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम.डी.ढोबळे सर, रत्नत्रय शिक्षण संस्था मांडवे चेअरमन प्रमोद दोशी ऍड.सुमित सावंत ,बाळासाहेब सरगर,एकशिव सरपंच शहाजी धायगुडे ,उद्योजक संदीपशेठ नरोळे ,राजेंद्र गायकवाड तीश ढेकळे,पै.उमेश सुळ ,किशोर जाधव,, गणेश गायकवाड, डॉ विवेक महामुनी, डॉ संदीप महामुनी, दत्ता रुपनवर दादासाहेब शिंदे संतोष चव्हाण बंदिश सो yuनवणे ध विजय कांबळे प्रवीण बोदडे धनाजी शिवपालक संदेश भालेराव दत्ता कांबळे सुनील भोसले गणेश गायकवाड नाना गायकवाड गणेश रणदिवे रोहित साळे प्रथमेश कांबळे पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ तसेच सामाजिक शैक्षणिक,औद्योगिक,वैद्यकीय, राजकीय क्षेत्रात, प्रशासकीय पोलीस सेवेत उल्लेखनीय काम मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्रा न्यूज चैनल चे प्रमुख प्रमोद शिंदे,प्रशांत खरात यांनी केले.

You may have missed