सतीश ढेकळे यांनी लोकांची तहान भागवून आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस केला साजरा
आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या जन्मदिनी सतिश ढेकळेंनीसलग दोन वर्षे 2 बोअर देऊन सामाजिक बांधिलकी जपत जन्मदिनाच्या आगळ्यावेगळ्या दिल्या शुभेच्छा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रमोद शिंदे) –

एकशिव ता माळशिरस येथील युवा उद्योजक सतिशतात्या ढेकळे यांनी सोलापूर जिल्ह्याचे भाजपा नेते व विधानपरिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकशिव येथे गेल्या वर्षी उन्हाळ्यात नागरिकांची तहान भागावी व पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी तसेच एकशिव येथील उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई यांचा विचार करून आणि आमदार रणजितदादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग दुसऱ्या वर्षी समाज बांधिलकी जपत बोर होल देऊन नागरिकांना पाण्याची सोय करून देऊन देत

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सतिशतात्यांनी आज पर्यत राजकारणा व्यतिरिक्त फक्त गोर गरीब सामान्य जनतेच्या हितासाठी व कोरोना कालावधी मध्ये एकशिव येथील ज्यांची परस्तीती नाजूक आहे अशा गोर गरीब सामान्य कुटुंबांना किराणा किट व दवाखाण्यासाठी शक्य तेव्हढि मदत केली तसेच प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये निस्वार्थी पणे सहभागी होऊन अनेक सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवत राबवले आहेत पुरोगामी महाराष्ट्र न्यूजने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना पुरोगामी महाराष्ट्राचा युवा उद्योजक हा पुरस्कार देऊन सन्मान केला

आहे.सामाजिक कामामुळे अतिश ढेकळे यांचे सर्वत्र कौतुक होत असूनबोरवेल मशीन चे पूजन माळशिरस पंचायत समितीचे मा.उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच शहाजीदादा धायगुडे, उपसरपंच भारत साळवे,सभापती सुग्रीव मोटे,मा.सरपंच रामभाऊ बागणवर व मा.उपसरपंच गुणवंत पाटील,उद्योजक प्रविण पांढरकर,ग्रा.सदस्य राहुल अवघडे, किसन रुपणवर अय्याज मुलाण,भीमराव जाधव,संजय जगताप, हमीद मुलाणी,प्रहार चे संभाजी गावडे,तात्यासाहेब गावडे,चंद्रकांत माने,बाळासाहेब खंडागळे,शंकर जाधव तोषिफ मुलाणी उपस्थित होते.अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनी सतीश ढेकळे यांचा सत्कार केला व सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या .