पिरळे येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अपंगांना फॅन व खुर्ची वाटप

पिरळे येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अपंगांना फॅन व खुर्ची वाटप
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे )-

पिरळे ता माळशिरस येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त ग्रामपंचायत पिरळे यांच्यावतीने अपंग व्यक्तींना फॅन व खुर्ची वाटप करण्यात आली.


महात्मा बसवेश्वर जयंती, शिवजयंती,रमजान ईद अक्षय तृतीया निमित्त ग्रामपंचायत पिरळे येथे संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी पिरळे येथे सदिच्छा भेट दिली तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमादरम्यान गावामध्ये शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस पाटील औदुंबर बुधावले,उद्योजक संदीप तात्या नरोळे,माजी विस्ताराधिकारी प्रल्हाद साळवे, पत्रकार प्रमोद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने फळे वाटप करण्यात आली. यावेळी सरपंच अलकाताई नरोळे,उपसरपंच उमेश खिलारे, ग्रामसेविका शैला साळवे, एकशिव गावचे सरपंच शहाजी धायगुडे,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लवटे,सुनील दडस,संदीप वाघ, दादासाहेब शिंदे,महादेव शिंदे,बाबुराव गायकवाड,कैलास निकम शिवाजी गोरे,प्रमोद डुडू, महावितरण चे वरिष्ठ लेखापाल दत्ता रुपनवर, प्रल्हाद नरोळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत पिरळे व उद्योजक संदीपसेठ नरोळे यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य दीपक शिंदे सर यांनी केले.

You may have missed