बारावी परीक्षेत नातेपुते केंद्राचा निकाल ९१.७६ टक्के.

बारावी परीक्षेत नातेपुते केंद्राचा निकाल ९१.७६ टक्के.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पुणे बोर्डा मार्फत फेब्रू. मार्च २०२२ मध्ये इ.१२ वी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.नातेपुते केंद्राचा निकाल हा ९१.७६ टक्के इतका लागला असून यात डॉ. बा. ज.दाते प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांचा निकाल ९५.६६ टक्के इतका लागला आहे.शास्त्र शाखा १००%, वाणिज्य शाखा ९६.७०%, तर कला शाखा ८९.६५% .


शास्त्र शाखेत प्रथम ओम पलंगे ८३.३३ , द्वितीय अजय सोनवणे ८०.८३ तृतीय सानिका उराडे ७९.८३
वाणिज्य शाखा प्रथम अपेक्षा मोरे ७७.५०,द्वितीय नितीन लवटे ७४.००,तृतीय अनामिका लोंढे ७२.५०
कला शाखा प्रथम राहुल मोहिते ८२.३४,द्वितीय निर्मिती ठेंगल ७८.१७,तृतीय धनश्री भरते ७७.६३ टक्के.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन, जि. प. माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,उपप्राचार्य भारत पांढरे मुख्याध्यापक प्रवीण बडवे व संस्थेचे पदाधिकारी यांनी केले.
चंद्रकांत घुगरदरे प्रशाला व ज्युनिअर कॉलेज या शाळेचा निकाल ९८.६८ टक्के इतका लागला आहे.


शास्त्र शाखा प्रथम दयाश्री रूपनवर ७८.१७, द्वितीय अनुजा बनकर ७७.८३,तृतीय शुभम म्हेत्रे ७५.८३.
कला शाखा प्रथम वैष्णवी मगर ७५.००, द्वितीय आशा सोनवळ ७४.१७, तृतीय आयेशा काझी ७३.१७%
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन रघुनाथ कवितके मुख्याध्यापक रवींद्र चांगन व संस्थेचे पदाधिकारी यांनी केले.

You may have missed