पिरळे येथे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत डोळे तपासणी शिबिर
पिरळे येथे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत डोळे तपासणी शिबिर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

पिरळे ता माळशिरस येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त संदीप तात्या नरोळे मित्र परिवार व एच व्ही देसाई आय हॉस्पिटल मोहम्मद वाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 जून 2022 रोजी सकाळी 9:30 वा. मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन विधान परिषद सदस्य आ.रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार रामभाऊ सातपुते अमृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील मा जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख पंचायत समिती माजी उपसभापती अर्जूनसिंह मोहिते-पटील मामासाहेब पांढरे, ए.पी.आय मनोज सोनवलकर व पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थिती राहणार असून या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संदीप नरोळे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच सौ.अलका रामलिंग नरोळे, उपसरपंच श्रीमती कमल दादा खिलारे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ पिरळे यांनी केले आहे.



