प्रथमेश कोठे यांच्या हस्ते मंत्री चंडक येथे वृक्षारोपण


  पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर.
मंत्री चांडक अंगण, हैदराबाद रोड येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महेश अण्णा कोठे विकास मंचच्या वतीने विविध जातीचे वृक्ष प्रथमेश दादा कोठे यांच्या हस्ते लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रथमेश कोठे यांनी वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश दिला. वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावले पाहिजे तसेच प्रामुख्याने महिलांनी एक झाड दत्तक घेतले असून झाड जगवण्याची जबाबदारी महिलांनी स्वीकारली आहे.या कार्यक्रमास महेश अण्णा कोठे विकास मंचचे अध्यक्ष रमेश गायकवाड, सचिव सुहास गायकवाड, सदस्य आर. टी. कांबळे, इराप्पा राऊत, नदाफ सर, बळगानुरे सर, डॉ मस्के, श्रवण, दत्ता निकंबे, पंढरी वाघमारे, जितेंद्र वाघमारे, दिलीप गायकवाड व महिला मंडळ उपस्थित होते.

You may have missed