सौ.सुशीलाबेन मोतीलाल शाह ट्रस्ट तर्फे दिव्यांगाना मोफत सायकल वाटप समारंभ संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे- जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ,शिक्षणमहर्षि, रतन माळी यांचे 70 व्या वाढदिवसानिमित्त दि.9.1.2020 रोजी दु.1 वाजता गणेश कला क्रीड़ा मंदिर येथे सौ.सुशीलाबेन मोतीलाल शाह चैरिटेबल ट्रस्ट तर्फे राहुरी चे संजय झाम्बरे, जेजुरीचे केरबा थोरवे,पुणेचे रणजीत भोसले यांना 3 चाकी सायकल आणि आझाद पिंजारी यांना व्हीलचेअर मोफत भेट दिली तर मागील वेळी मनी पाणसे या दिव्यांगाने भेट दिलेल्या 3 चाकी सायकल वर मागील वार्षिच्या अपंग मेरेथांन मधे 2रा आणि या वर्षी पहिला नंबर मिळविला म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मोतीलाल शाह,सौ.सुशीलाबेन आणि विश्वत मनोजभाई व सुनीलभाई शाह,लिज्जत पापडचे सुरेश कोते, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते,सामाजिक कार्यकर्त्यां पुष्पा कटारिया,गायक तरुणजी मोदी ,रविन्द्र वाघ प्राचार्या स्मिता वाघ ,सुविधा नाईक, रशियन पाहुने इरलीन चित्रकार,मराठी लावणी डान्सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्तविक मधेय फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोक म्हणाले की सौ.सुशीलाबेन ट्रस्ट गेली 15 वर्षे पुणे परिसरात वंचितासाठी सामाजिक कार्य करीत असून गेल्या 11 वर्षात 255 दिव्यांगाना 3चाकी व व्हीलचेअर वाटप केले आहे.हा उपक्रम वर्षातुन ते दोनदा करीत असून मोठे प्रमाणात दिवाळी फराळ वाटप व इतर कार्यक्रम घेत असतात.कार्यक्रमाचे सुरुवातीला बचपन वर्ड फोरम च्या घरटे प्रकल्पातील 40 अनाथ मुलांनी सलग 20 मिनिट छत्रपति शिवाजी महाराज यांचे जीवनातील प्रसंग सूंदर रित्या नृत्यातून प्रदर्शित करून कार्यक्रमाची ऊंची वाढविली तसेच महाराष्ट्राची शान म्हणजे छत्रपति शिवराय हे दाखविले म्हणून या नृत्याला अनेक मान्यवरानी रोख बक्षीसे दिली.यावेळी दिव्यांग व्यवसाय गटातर्फे रोजगार व्यवसाय आणि स्वालंबन कार्ड मेळावा 12 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत सावित्रीबाई फुले स्मारक,लोहियानगर येथे दिव्यांगानी संपर्क करावे असे आवाहन रघुनाथ ढोक यांनी केले तर कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य शाह कुटुबीय , व आकाश ढोक ,सचिन पवार,जॉनी रानडे,अनिल कदम यांनी केले.