अकलुज येथे भव्य राज्य स्तरीय जैन वधु वर पालक परिचय मेळावा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (अकलूज )-अकलुज येथे भव्य राज्य स्तरीय जैन वधु वर पालक परिचय मेळावा श्री सन्मती सेवा दल या बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्थेने आयोजित केल्याची माहिती या दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी यांनी दिली. या मेळाव्यात महाराष्ट्रासह कर्नाटक,गुजरात, मध्यप्रदेश आदि राज्यातील ४५०वधु व ३२५ वर यांची नोंदणी झाली असून, अजूनही नाव नोंदणी सुरु असून आप आपल्या भागातील सन्मती दलाच्या कार्य कर्त्याशी संपर्क साधन्याचे आवाहन मिहिर गांधी यांनी केले आहे, पापरी परिसरात या मेळाव्याच्या पत्रिका देण्यासाठी ते आले होते त्यांनी सदर माहिती दिली.

 वधु वर यांच्या नाव नोंदणीची  संख्या पाहता अकलुज परिसरात आज पर्यन्तचा काळातील सर्वात मोठा हा वधुवर पालक परिचय मेळावा ठरेल व यातून अनेकांचे ऋणानुबन्ध जोडून, राज्याच्या सीमा पार करत नविन नाती तयार होणार आहेत असेही गांधी म्हणाले.  

  रविवार दि १२ जानेवारी रोजी कांतिलाल सांस्कृतिक भवन येथे सकाळी ८:३०वा या वधुवर पालक मेळाव्याचे उद्घाटन संपन्न होणार असून यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटिल, प्रसिद्ध प्रसुति तज्ञ डॉ सतीश दोशी, चंदुकाका सराफ अण्ड सन्स बारामतीचे चेयरमन किशोरकुमार शहा,उद्योजिका सुजाताताई शहा, सोलापुर जिल्हा सराफ असो सियेशनचे उपाद्यक्ष सुहास शहा आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

   श्री सन्मती सेवा दलाचे वधुवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्याचे हे सहावे वर्ष आहे, दरवर्षी या मेळाव्यात  वधु उमेदवाराकडुन नाव नोंदणी साठि प्रवेश फि आकारली जात नाही, वर उमेदवारा कडुन प्रवेश फि घेतली जाते. या वर्षीच्या वधु वर पालक परिचय मेळाव्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, आदि राज्यातील ४३० वधु व ३०० वर उमेदवार यांच्या नाव नोंदणी झाल्या आहेत. अजूनही नाव नोंदणी सुरु असून नाव नोंदविन्याचे आवाहन गांधी यांनी केले आहे.

 वधुवर मेळावा यशस्वी करन्यासाठी दलाचे विद्यमान अध्यक्ष मयूर गांधी, विरकुमार दोशी, अभिजित दोभाडा, अभिजित दोशी, स्वप्निल गांधी, जिनेंद्र दोशी, महावीर शहा, अविनाश दोशी, प्रितम कोठारी, नवजीवन दोशी, डॉ राजेश शहा, आदि आजपर्यन्तचे माजी अध्यक्ष पदाधिकारी, विविध भागातील संचालक, सभासद सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.