स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दहिगाव हायस्कूलची पहिली पालक व शिक्षक सभा संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे) – दहिगाव हायस्कूल दहिगाव ता. माळशिरस येथे हायस्कूलची पालक व शिक्षक पहिली सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ही सभा संस्थेचे अध्यक्ष वंदनादेवी आशिष मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या सभेचा उद्देश स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा प्रत्येक घरावरती तिरंगा फडकवण्याविषयी मार्गदर्शन ,पालक शिक्षक मेळावा तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी समस्या निवारण व विविध विषयावरती चर्चा सत्र असे होता.या सभेमध्ये अनेक पालकांनी शाळेच्या गुणवत्तेचे व शिक्षकांचे कौतुक केले तसेच संस्थेच्या अध्यक्ष,संचालक व मुख्याध्यापक यांच्याकडे अतिरिक्त भौतिक सुविधांच्या मागणी ही पालकांकडून करण्यात आली आहे.यावर संस्थेचे अध्यक्ष व संचालक यांनी भौतिक सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले. या सभेमध्ये संस्थेचे अध्यक्ष वंदनादेवी मोहिते, माजी उपसरपंच विजयसिंह पाटील ,संचालक वनिता देवी पाटील,मुख्याध्यापक मुकुंद मोरे सर, पत्रकार प्रमोद शिंदे, बुधावले सर, पाटील सर ,यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी शाळेचे माजी शिक्षक चंद्रकांत दिक्षित सर,निर्मळ सर, चव्हाण सर, बारवकर सर, कुंभार सर,राऊत सर,भुजबळ सर, पवार सर फुले सर भोसले मॅडम,पाटील मॅडम,माने सर व सर्व शिक्षक स्टाफ तसेच पिरळे,दहिगाव,जीनपुरी,फुलेनगर व पंचक्रोशीतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सांगता मुख्याध्यापक मुकुंद मोरे सर यांनी केली.

You may have missed