डॉ.बा.ज दाते प्रशालेचे नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये उज्वल यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- डॉ बा.ज दाते प्रशाला नातेपुते ता.माळशिरस येथील विद्यार्थी सार्थकराजे जानकर व साई खंडागळे इयत्ता सहावी या विद्यार्थ्यांची नवोदय प्रवेश प्रक्रिया मधून नवोदय विद्यालय मध्ये निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे मार्गदर्शक संचालक बाबाराजे देशमुख, संस्थेचे चेअरमन डॉ एम पी मोरे,जनरल सेक्रेटरी वीरेंद्र सेठ दावडा,सभापती मामासाहेब पांढरे यांनी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच प्रशालेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक प्रवीण कुमार बडवे,मुख्याध्यापक विठ्ठलराव पिसे,सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय पवार सर तसेच पालक व इतर शिक्षक उपस्थित होते.

You may have missed