ज्ञानदीप ब्लड बँक नातेपुते येथे रक्तदान करा आणि प्रेमाचे नाते जोडा- प्रा ढोबळे*

ज्ञानदीप ब्लड बँक नातेपुते येथे रक्तदान करा आणि प्रेमाचे नाते जोडा- प्रा ढोबळे*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – रक्तदान ही काळाची गरज रक्तदान श्रेष्ठदान आहे. म्हणून ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.ढोबळे एम.डी. यांच्या माध्यमातून नातेपुते ता. माळशिरस,जि. सोलापुर या ठिकाणी ज्ञानदीप ब्लड बँक सुरू केली आहे.रक्तदान हे आजच्या काळातील सर्वात श्रेष्ठ दान असे मानले जाते आणि याच माध्यमातून गोरगरीब नागरिकांना सर्वसामान्याना रक्त पुरवठा कमी भासू लागला आहे म्हणून प्रा. ढोबळे यांच्या माध्यमातून नातेपुते या ठिकाणी ब्लड बँक सुरू केली आहे, जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी जाऊन रक्तदान करावे की जेणेकरून सर्वसामान्यांना आपण जे केलेले दान रक्ताच्या माध्यमातून ते मिळाले पाहिजे हाच या पाठीमागचा हेतू आहे काही नागरिकांना कोरोनाच्या संकटामध्ये रक्त हे गेल्या दोन वर्षांपूर्वी कमी भासू लागले होते.

यामध्ये कित्येक लोकांचे रक्त नसल्यामुळे प्राणही गेले आहेत तर काहींना रक्तपुरवठा वेळेअभावी मिळाला नाही म्हणूनच नातेपुते या ठिकाणी प्रा. ढोबळे यांच्या माध्यमातून माणुसकीचे भान ठेवून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वसामान्यांना गरजेसाठी त्यांना रक्ताचा साठा कमी पडू नये म्हणून त्यांनी ब्लड बँक सुरू केली आहे. प्रा ढोबळे बोलताना म्हटले की रक्तदान ईश्वर सेवा , • आपल्या परिसरातील रक्त व रक्तघटकांची गरज परिपूर्ण करण्यासाठी रक्तसंकलन महत्वाचे आहे .

यासाठी सामाजिक , सहकारी , राजकीय व सेवाभावी संस्थासह त्यांचे पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते , वैयक्तीक रक्तदाते यांची मोलाची साथ मिळणार याची खात्री आहे . आपल्या गावातील , आपल्या तालुक्यातील रक्तदान शिबीर आयोजित करून आपल्या बँकेस सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी . स्व – इच्छुक करून ज्ञानदीप ब्लड रक्तदात्यांनी रक्तदान बँक नातेपुते च्या रजिस्टरमध्ये ” ” सेवा शुभारंभ रक्तदाता ” ची नोंद करावी यावेळी ज्ञानदीप ब्लड बँकेचे चेअरमन प्रा.ढोबळॆ सी.डी,व्हा.चेअरमन डॉ. हनुमंत माने,सचिव संजय कोडलकर साहेब,खजिनदार आप्पा शेंडगे आदी उपस्थित होते.

पता : ज्ञानदीप ब्लड बैंक देशमुख कॉम्प्यूटर सेंटर शेजारि बस स्टॅण्डजवळ नातेपुते . ता . माळशिरस जि . सोलापूर . – 9890479458 , 8080927083 , 8830192007 , 9665748469 , 9860229473 .या ब्लड बँक च्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी रक्तदान करावे व ज्यांना वाढदिवस निमित्त शिबिराचे आयोजन करण्याचे असेल तरीही त्यांनी या ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर करण्याचे आव्हान प्रा.ढोबळे यांनी केले आहे

You may have missed