संकटांना संधी समजा व इतिहास घडवायला शिका – प्रा.नितीन बानगुडे पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-
संकटांना संधी समजा व इतिहास घडवायला शिका नेहमी संकटाला सामोर्यजा असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे-पाटील यांनी नातेपुते येथे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त केले.बोलताना पुढे ते म्हणाले की जी माणसं परिस्थितीची कारण सांगतात ती माणसं कधीच यशस्वी होत नाहीत. माणूसच परिस्थिती घडवतो व बिगडवतो त्याला जबाबदार परिस्थिती नसून माणूसच असतो.ज्याच्या मागे लोक असतात खऱ्या अर्थाने तोच माणूस श्रीमंत असतो व त्या श्रीमंत माणसाचा पराभव कधीच होत नाही.तसेच असंख्य लोक एकत्र आले की यश गाठता येते. शिवाजी महाराज यांनी पहिली सहकारी संस्था निर्माण केली. पिक जगली तर शेतकरी जगेल हा विचार त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. जिजाऊंच्या एका कौतुकाच्या थापेने तानाजी घडवला स्वराज्य सुद्धा कौतुकीच्या खात्यावर उभे राहिले. ज्याला पर्याय काढता येत नाही ते यशस्वी होत नाहीत अशाप्रकारे त्यांनी उपस्थित मार्गदर्शन केले.

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख म्हणाले की माणसाने मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे ते मामासाहेब पांढरे यांनी केला आहे. मामांनी समाजकारण करत करत राजकारणात प्रवेश केला व संधीचं सोनं केलं पुढेही त्यांना चांगल्या संधी मिळतील.यावेळी मामासाहेब पांढरे यांचा नागरिक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते राजेंद्र पाटील, रघुनाथ कवितके,डॉ एम पी मोरे, दामोदर काळे,माजी सरपंच नगरसेवक बी वाय राऊत, एपीआय मनोज सोनवलकर,मुख्याधिकारी माधव खांडेकर, ऍड शिवाजीराव पिसाळ,माऊली पाटील, नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,बांधकाम सभापती अतुल पाटील, नगरसेवक अतुल बावकर स्वाती बावकर संगीता काळे भारती पांढरे तसेच सर्व नगरसेवक व पंचक्रोशीतील युवक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

