जि प शाळा पिरळे च्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

जि प शाळा पिरळे च्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

जि. प. प्रा. शाळा,  पिरळे या शाळेचा विद्यार्थी स्नेह मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी माजी विस्तार अधिकारी बी.एम पाटील सर तसेच सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे सचिव मुख्याध्यापक संभाजी फुले सर, राजेश भांबुरे सर, चंद्रशेखर शिवगुंडे सर, सविता साळवे मॅडम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. स्नेह मेळावा इयत्ता सातवी  बॅच 1999 या माजी विद्यार्थ्यांचा होता या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक वर्ग यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शालेय जीवनामध्ये घडलेले विविध प्रसंग,आठवणींना उजाळा दिला तसेच तसेच सर्व शिक्षकांना सन्मानित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील वाघमोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन सुनील ठोंबरे,भारत शिंगाडे, शिवाजी लवटे,जनार्दन शिंदे,विश्वास बनकर, आणि मंगल सूर्यवंशी,विद्या गांधी,दिपाली वाघमोडे,तसेच सर्व माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी  केले.या कार्यक्रमास माजी विद्यार्थी सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित होते.

You may have missed