दहिगाव वरून जाणारा डाळज शिंगणापूर रोड विद्यार्थ्यांसाठी धोकादायक

दहिगाव वरून जाणारा डाळज शिंगणापूर रोड विद्यार्थ्यांसाठी धोकादायक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- दहिगाव नातेपुते वरून जाणारा डाळज-शिंगणापूर रोड विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनत आहे. गेल्या अनेक दिवसापासून या रोडचे काम संत गतीने सुरू होते सदर रोड चे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून या रोडमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यामध्ये क्यामध्ये आला आहे. डाळज-वालचंदनगर- दहिगाव- नातेपुते- शिंगणापूर हा प्रमुख रहदारीचा रस्ता असून रस्ता नगर,कोल्हापूर, सांगली,सातारा पंढरपूर पुणे आळंदी रोडला जोडला जातो त्यामुळे या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.या रस्त्याने वाहतूक असल्याने व रस्त्याचे काम पूर्ण होत आल्याने वाहने अतिशय वेगाने जात आहेत यामुळे ठिकठिकाणी अपघात सुद्धा होत आहेत.अपघात होऊ नये म्हणून अनेक वेळा संबंधित विभागाला गावाच्या शेजारी गतिरोधक टाकण्याची विनंती संबंधित ग्रामस्थांनी व शाळेने केले आहे.दहिगाव येथे दहिगाव हायस्कूल दहिगाव हे रस्त्यालगत असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या शाळेला सायकल वरून रस्ता ओलांडून येत असतात त्यामुळे इथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही वाहनांच्या वेगाने विद्यार्थी भीतीने रस्त्यावर सायकलीवरून पडतात व त्यांना दुःखा पत ही होते. त्यामुळे दहिगाव शाळे जवळ संबंधित ठेकेदार व विभागाने झिगझॅक गतिरोधक व शाळा दर्शवणारे फलक लावावे तसेच कळंबोली शाळा पिरळे चौक,दहिगाव पिरळे रोड नातेपुते दहिगाव रोडवरील काळे पेट्रोल पंप,चैतन्य मंगल कार्यालय नजीक तसेच प्रत्येक गावाच्या ठिकाणी गतिरोधक करून फलक लावण्यात यावे या भागात विद्यार्थी अथवा इतर कोणाचा अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार व विभागातील अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी एन डी एम जे विद्यार्थी संघटनेने केली आहे. प्रत्येक गावा नजीक झिगझॅक गतिरोधक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील एनडीएमजे संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांनी दिला आहे या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे ही दिसून येत आहे लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या रस्त्याकडे डोळसपणे लक्ष दिले पाहिजे.

You may have missed