मामा पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त 623 रक्तदात्यांकडून रक्तदान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते येथे रेकॉर्ड ब्रेक 623 रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले. मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली सप्ताह भर वेगवेगळ्या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते त्यामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले.
आतापर्यंत च्या कालावधीत 623 एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान झाले नव्हते मामासाहेब पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे हितचिंतक युवक प्रेमी यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, उद्योजक अहिल्या पतसंस्थेचे चेअरमन घुनाथ अण्णा कवितके व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन साई सेवा दल गुरु करचे ,सोमनाथ भोसले यांच्या वतीने करण्यात आले.नातेपुते व पंचक्रोशीतून युवकांनी रक्तदान करून मामासाहेब पांढरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शिबिरास शिवाजीराव पिसाळ,आप्पासाहेब भांड, माउली पाटील, उद्योजक महेश शेटे, सरपंच संदीप नरोळे,शहाजी धायगुडे,सतीश ढेकळे नगराध्यक्ष उत्कर्षारांनी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, बांधकाम विभाग सभापती अतुल पाटील नगरसेवक अतुल बावकर,सुरेंद्र सोरटे तसेच सर्व नगरसेवक मामाश्री प्रतिष्ठानच साई सेवा दलचे कार्यकर्ते व पंचक्रोशीतील युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते हे शिबिर ज्ञानदीप ब्लड बँक नातेपुते हनुमंत माने, ढोबळे सर व आप्पासाहेब शेंडगे यांच्या वतीने घेण्यात आले.




