ठाणे शहरात बौद्ध,दलितांची 40 घरे जाळल्याप्रकरनी मंत्रालयात तीव्र पडसाद*
*वैभव गितेंनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेऊन आरोपिंविरुद्ध कडक कारवाई करून कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची केली आक्रमकपणे मागणी*
नातेपुते (प्रमोद शिंदे) — ठाणे ब्रह्मांडरोड जवळील झोपडपट्टी दि.03/01/2020 रोजी जातीयवाद्यांनी दलीत वस्तीला आग लावली या आगीत 35 ते 40 झोपड्या जळाल्या असून घरातील संसारउपयोगी साहित्य व महत्वाची कागदपत्रे जळाली आहेत अमोल बालाजी पाईकराव यांनी कासार वडवली पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा. रजि.नंबर.06/2020 भादवी 436,506,34 व एट्रोसिटी ऍक्ट च्या 3 (1) z नुसार गुन्हा दाखल आहे पुढील तपास वर्तकनगर सहाययक पोलिस आयुक्त पंकज शिरसाट हे करीत आहेतनॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस राज्य सचिव सचिव वैभव गिते यांनी मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले निवेदनात आरोपींवर कडक कारवाई करावी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व समाजकल्याण अधिकारी यांनी घटनास्थळी भेट द्यावी,कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी फिर्यादी व साक्षीदार यांना पोलिस संरक्षण देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सर्व कुटुंबांचे आहे त्याच ठिकाणी पक्की घरे बांधून देऊन पुनर्वसन करण्याची मागणी केली सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक (ना.ह.स)मुख्यालय मुंबई यांना दिले आहेतदोन दिवसांपूर्वी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ. केवलजी उके साहेबांच्या आदेशाने राज्य सचिव वैभव गिते,मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनवणे, प्रदेश सचिव शशिकांत खंडागळे,नवनाथ भागवत,रोहित साळे यांच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन अत्याचारग्रस्त व्यक्तींशी चर्चा केली कायदेशीर अधिकारांची माहिती दिली सांत्वन केले पुनर्वसन करण्यासाठी संघटना आपल्या पाठीशी राहील असे आश्वासन दिले होतेघोडबंदर रोड पातलीपाडा हिरानंदानी ईस्टेच्या लगत हिरानंदानी ते ब्रम्हांड जाना-या रोडच्या बाजुला लागुन कमित कमी 10 ते 15 वर्षापासुन झोपडपट्टी बसलेली आहे हे लोक अनेक ठिकानावरून रोजी रोटीच्या शोधात या ठिकानी आलेले आहे बरेच मंडळी कुटूंब विदर्भातील पुसद येवतमाळ नांदेड च्या ठिकानातील जास्तीत जास्त बौध्द ,मातंग आदिवासी या जाती-जमातीमधिल कुटूंब आहेत हिरानंदानी येथिल ऊच्चभ्रु वस्तीमध्ये धुनी भांडी आणी जे मिळेल ते काम करून जीवन व्यथित करनारी हि जनता आहे रूम भाडे तत्वावर घेऊन राहण्या ईतकी आपली ऐपत नसल्यामुळे ते या झोपडपट्टीत राहत होते . लोक झोपड्या खाली का करत नाही म्हणुन दिनांक 03/01/2020 यादिवशी भरदिवसा आरोपींनी झोपड्यांना आग लावून पळ काढला असे काही प्रत्येक्ष दर्शी सांगत आहेत आणी त्या आगी मध्ये 35ते 40 झोपड्या जळून संसार रस्त्यावरती आला आहे त्यांना कपडे नाहीत अन्न नाही पैसा नाही जीवनावश्यक वस्तु त्यांच्यकडे नाहीत त्यांची लहान मुल रस्त्यावर कडाक्याच्या थंडीत ऊघड्यावर झोपत आहेत कोनतीही प्रशासकीय मदत त्यांना मिळाली नाही एट्रोसिटी अँक्ट च्या नियमांनुसार सर्व कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे)या संघटनेने दिला आहे.*1) फोटो ओळ कारवाई संदर्भात धनंजय मुंडे यांना निवेदन देताना राज्य सचिव वैभव गीते2) जळीत घटनास्थळ व येथील पीडित