दहिगाव येथील आठवडी बाजारात संक्रांतीनिमित्त रेकॉर्ड ब्रेक गर्दी*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ( प्रमोद शिंदे)- दहिगाव ता.माळशिरस जिल्हा सोलापूर येथे दर रविवारी जेमतेम आठवडे बाजार भरत असतो हा आठवडी बाजार गेली एक वर्षापासून सुरू झाला आहे.या आठवडी बाजाराला आता मोठ्या प्रमाणात स्वरूप येऊ लागले आहे आज मकर संक्रातीनिमित्त दहिगाव आठवडी बाजारामध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहावयास मिळाली याचे कारण असे की येत्या बुधवारी मकर संक्रांति असून मंगळवारी भोगी आहे भोगी निमित्त खेंदाट गरगटी भाजी करण्याची परंपरा वर्षानुवर्ष महाराष्ट्रात चालू आहे या खेंदाट भाजीसाठी  अनेक भाज्या लागतात अनेक भाज्या वापरून खेंदाड केले जाते या घरगटी भाजीसाठी पालक, चाकवत ,गाजर,आंबट बोर, टोमॅटो, हरभरा,घेवडा,पावटा,अशा प्रकार च्या अनेक  भाज्या मिळून भाजी केली जाते त्या भाज्या घेण्यासाठी दहिगाव बाजार येथे आज गर्दी पहावयास मिळाली या बाजारात नातेपुते,पिरळे,एकशिव,चंद्रपुरी कुरबावी,गुरसाळे, अलंकापुरी,फुलेनगर,बावन चाळी येथील लोक बाजारासाठी मोठ्या संख्येने आले होते. याचे कारण संक्राती सणाचा हा शेवटचा एकमेव बाजार असल्याने या बाजारात गर्दी झाली होती बाजारामध्येे पालेभाज्या सह तिळगुळ बांगड्या व सना साठी लागणारे साहित्य याची विक्री मोठ्याा प्रमाणात झाली आहे हळूहळू दहीगाव येथील आठवडी बाजार वाढत असल्याचं दिसून येत आहे