वसई -विरार शहरात अशुद्ध पाण्याची खुलेआम विक्री;५१ पाणी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क( मुंबई )-वसई -विरार शहरात अशुद्ध पाण्याची खुलेआम विक्री;५१ पाणी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

भाजपचे अशोक शेळके यांच्या मागणीला यश

नालासोपारा(प्रतिनिधी)-वसई विरार शहरात खुलेआमपणे आरोग्यास अपायकारक असे अशुद्ध पिण्याचे पाणी विक्री केले जात असल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब उघडकीस आली आहे.वसई-विरार शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याने पिण्याचे दूषित पाणी विक्री करणाऱ्या शहरातील ५१ व्यावसायिकांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तुळींज पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाणी विक्रेते आणि व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.दरम्यान अशा प्रकारे दूषित पाणी विक्री करणाऱ्या संबंधितांवर फॊजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या यावा मोर्चाचे उपाध्यक्ष तथा पालघर जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य अशोक गजानन शेळके यांनी केली होती.त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
साथीच्या विविध आजारापासून रक्षण व्हावे यासाठी वसई-विरार शहरातील सुमारे ७० टक्के हुन अधिक लोक दैनंदिन पिण्याच्या वापरासाठी पाणी खरेदी करतात. मात्र आपण पीत असलेले हे पाणी नेमके कसे आहे? याबाबत नागरिकांना फुसटशी कल्पना देखील नसते. नागरिक विकत घेऊन पीत असलेले हे पाणी आरोग्यास घातक असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. पिण्याच्या पाण्याची विक्री करणाऱ्या अनेक बोगस कंपन्या वसई-विरार शहरात ठिकठिकाणी बस्तान मांडून बसल्या आहेत.विनापरवानगी बेकायदेशीरपणे या कंपन्या शहरातील नागरिकांना बिनदिक्तपणे अशुद्ध आणि पिण्यास अपायकारक पाणी विकून महिन्याकाठी लाखो रुपयांची मलाई लाटत आहेत. भाजपच्या अशोक शेळके यांनी या गंभीर प्रकरणी सातत्याने पत्रव्यवहार -पाठपुरावा करून राज्य शासन, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अशोक शेळके यांच्या मागणीनंतर वसई – विरार शहरातील पाणी विक्रेत्यांकडे पाण्याचे नमुने तपासण्याचा निर्णय घेण्यात होता.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती – ब मधील पिण्याच्या पाण्याचे नमुने मुख्य अणुजिवी शास्त्र, जिल्हा आरोग्य प्रयोग शाळा, ठाणे यांच्या मार्फत तपासले गेले असता, सदरचे पाणी हे पिण्यास अपायकारक असल्याचे अभिप्राय देण्यात आला आहे. प्रभाग समिती – ब मध्ये एकूण ५७ पाणी विक्री करणाऱ्या कंपन्यांचे पाणी पिण्यास अपायकारक असल्याचे या तपासणीमद्धे निष्पन्न झाले आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून या ५७ पाणी विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटीस जरी बजावण्यात आल्या होत्या.या बोगस कंपन्यांनी महानगरपालिकेच्या आदेशाला न जुमानता पाणी विक्री करण्याचा व्यवसाय चालूच ठेवला
होता.दरम्यान ५७ पैकी ५१ पाणी विक्रेत्यांवर पालिकेच्या आरोग्य विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. महानगरपालिकेच्या केवळ एकाच प्रभागात इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस कंपन्या आहेत, तर इतर प्रभागांत काय अवस्था असेल, असा सवालही सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. अशुद्ध पिण्याचे पाणी राजरोसपणे विकले जात असल्याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात अशोक शेळके यांनी महाराष्ट्र नेटवर्क ला माहिती दिली

गुन्हे दाखल झालेले पाणीविक्री व्यावसायिक-

१)शिवकुमार चौहान
२)रविकांत उपाध्याय
३)औरंगजेब,
४)मोहंमद हयान
५)अशोक गुप्ता,
६)मोबिन अन्सारी
७)मोनू सोनी
८)दिलीप सिंग
९)तयब अली
१०)चंदन श्रीवास्तव
११)मनीष मिश्रा
१२) दाऊद शेख
१३)अमित सिद्दिकी
१४)धर्मेंद्र यादव
१५)सुरजी गुप्ता
१६)सनी गुप्ता
१७)विनय गुप्ता
१८)दिनेश पारधी
१९)मोहंमद रुस्तम
२०)जगदीश पाटील
२१)मुजीब खान
२२)रामचंद्र यादव
२३)अवधेश गुप्ता
२४)रोशन कुमावत
२५)महेश सोळंखी
२६)विजय शहा
२७)मोहंमद कासीम
२८)अब्दुल गनी मोहंमद
२९)हरिश्वर सोनी
३०)शमीम खान
३१)मोहंमद सहानी
३२)दिलीप पांडे
३३) मोहंमद शाबीर
३४)रामचंद्र रभी,
३५)मोहंमद आयुब
३६)शिव मिश्रा
३७)अभिलाष गोस्वामी
३८) मुशर्रफ खान
३९)संतोष शिंदे,
४०) तरन्नुम शेख
४१) आरिफ शेख
४२)पन्नालाल गुप्ता
४३)राजेश कश्यप
४४)दिलीप सिंग
४५) मोहंमद शाहीन
४६)कल्पेश जैन
४७) मोहंमद इस्लाम,
४८) अजित तुंबडा
४९)कविता सोनवणे,
५०)अभिषेक गुप्ता
५१)हरिलाल गुप्ता.