नातेपुते येथे रिवायडींग दुकानाचे शटर उचकटून 160 किलो रिवायडींग वायरची चोरी,अयीन सणात चोरी करून चोरांचे पोलिसांना आव्हान
नातेपुते येथे रिवायडींग दुकानाचे शटर उचकटून 160 किलो रिवायडींग वायरची चोरी,
अयीन सणात चोरी करून चोरांचे पोलिसांना आव्हान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

नातेपुते दहिगाव रोड येथे गणेश उत्सवाच्या रात्री 31 ऑगस्ट रोजी शिवकृपा इंजिनिअरिंग वर्क्स मोटर रिवायडींग या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 14 हजार रुपये किमतीचे रिवायडींग वायरची चोरी केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची हकीकत अशी की तानाजी कदम राहणार कुरवली ता. इंदापूर यांचे नातेपुते येथे इंजिनिअरिंग वर्क्स व मोटार रिवायडींग चे भाडोत्री दुकान आहे. तानाजी कदम व त्यांचे बंधू अभिजीत कदम यांनी बुधवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे काम उरकून दुकानाला कुलूप लावून बंद केले.गुरुवारी सकाळी दुकानात काम करणारा नोकर सकाळी कामावर आल्यावर चेतन गोकुळ पांडुळे याला दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. त्याने ही माहिती कदम यांना दिली तात्काळ कदम नातेपुते येथे आले असता त्यांना दुकानातील सर्व मोटर, स्टार्टर, केबल,वायडिंग केबल व इतर साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसले.

यामध्ये अज्ञात चोरट्याने दुकानातील 42 हजार रुपये किमतीचे अंदाजे 70 किलो असलेली ऍग्रो फोर्जिंग कंपनीचे पांढऱ्या रंगाची वायर 72 हजार रुपये किमतीचे मोटार रिवायडींग येथील जुने स्क्रॅप वायडिंग वायर अंदाजे 160 किलो अशी एकूण1लाख 14 हजार रुपये किमतीचे मोटार रिवायडींग चे साहित्य चोरून नेल्याचे दिसून आले. सदर घटनेबाबत नातेपुते पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दहिगाव रोडवरील संतोष हार्डवेअर या दुकानाचे शटर सुद्धा उचकटण्याचा चोरट्याने प्रयत्न केला.पोलीस तपास चक्र फिरवून पोलीस तपास करत असताना नातेपुते येथील मस्के भाऊसाहेब यांच्या घराच्या जवळ दुसऱ्या दिवशी जवळपास 70 किलो रिवायडींग ची वायर सापडला असून याबाबत नातेपुते पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे,पीएसआय तानाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मासाजी थोरात हे तपास करत आहेत. सदर घटने संदर्भात तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी पत्रकार व व्यापारी यांची बैठक बोलवून सदर गंभीर घटनेबाबत विचारविनिमय करून प्रतिबंधात्मक उपाय योजना आपण सर्वांनी मिळून करूया असे आवाहन केले. या घटनेवरून असे निदर्शनास येते की सणामध्ये व्यस्त असताना चोर याचा फायदा घेऊन चोरी करतात व नवीन अधिकारी रुजू झाल्यानंतर चोरटे चोरी करण्याचा प्रयत्न करतात व जणूकाही नवीन अधिकाऱ्याला एक प्रकारचे आव्हानच देण्याचा प्रयत्न करतात असे निदर्शनास येत आहे.


